जाहिरात
Story ProgressBack

मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?

वर्धा जिल्ह्यातील नालवाडी परिसरामध्ये दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Time: 2 mins
मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?

- निलेश बंगाले, वर्धा

वर्धा जिल्ह्यातील नालवाडी परिसरामध्ये दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भावना राहुल बहाळे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला आहे. मूळच्या यवतमाळच्या असणाऱ्या भावना वर्ध्यामध्ये मुलासह भाड्याच्या घरामध्ये राहत होत्या. त्यांच्या घरामध्ये दोन कोटी रुपये असल्याची माहिती चोरट्यांना मिळाली. यानंतर चोरट्यांनी दोन दिवस भावना यांच्या घराची रेकी केली आणि मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून 30 हजार रुपयांच्या रोखरक्कमेसह दागिने जबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

(ट्रेडिंग न्यूज : पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; 5 जणांचा मृत्यू)

यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दरोड्यातील नऊ जणांच्या टोळीला अटक केली आणि त्यांच्याकडील 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बहाळे यांच्या घराशेजारीच फायनान्सशी संबंधित एक कार्यालय  होते. इथल्याच एका व्यक्तीने आरोपींना बहाळेंच्या घरामध्ये दोन कोटी रुपये असल्याचे सांगितले आणि सोबतच चोरीच्या मालातील हिस्साही द्यावा लागेल, अशीही मागणी केली. माहिती देणाऱ्याचे नाव मिथुन असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यानेच मुंबईतील आपल्या साथीदारांनी पैशांबाबतची माहिती दिली. 

(ट्रेडिंग न्यूज : सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश)

यानंतर 22 मे रोजी रामा आणि मिश्रा हे दोन आरोपी शहरामध्ये आले आणि त्यांनी बहाळे यांच्या घराची पाहणी करून चोरीचा कट रचला. घर आणि चोरीच्या कटाची माहिती त्यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांनाही दिली. यानुसार अन्य आरोपी भिवंडीतून वर्ध्यामध्ये 6 जून रोजी दाखल झाले. सर्व आरोपींनी मिळून पुन्हा एकदा घराची पाहणी केली. कटानुसार शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दरोडा घालून चोरीचा डाव साधण्यात आला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या नऊ जणांना बेड्या ठोकल्या.

(ट्रेडिंग न्यूज : मित्रांची मस्ती जिवावर बेतली; नवी मुंबईत अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू)

ST Pass : महत्त्वाची बातमी : रांगा लावायची गरज नाही, विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ST चे पास

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?
Lok sabha election result major changes in BJP political news
Next Article
भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? लोकसभेतील पराभवाचा कुणाला फटका बसणार?
;