Nagpur Municiple Corporation Election 2026: राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. राज्यातील अनेक मतदान केंद्रांमधील एव्हीएमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशातच नागपूरमध्ये मात्र मतदानाच्या आदल्या रात्री मोठा संघर्ष पाहायला मिळत असून काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
भाजप काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष
नागपूरमध्ये मतदानाच्या पुर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे नागपुरमधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेस उमेदवाराच्या पतीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपुमध्ये प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, नागपुरात महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक हैं तो सेफ है चा नारा चर्चेत आला आहे. नागपूर शहरातील मेहंदीबाग परिसरात लागले ‘एक है तो सेफ है' चे बॅनर झळकले आहेत. हिंदू रक्षा समितीने हे ‘एक है तो सेफ है' चे बॅनर लावले आहेत. संपूर्ण परिसरात झळकलेल्या या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोलापूरमध्ये उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची..
दरम्यान, सोलापुरातील प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये बचाबाची झाल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवारासमोरील बटन दबत नसल्याची तक्रार मतदाराने केली असता अधिकाऱ्याने परस्पर भाजपचे बटन दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुनच प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. अपक्ष उमेदवाराच्या नवासमोरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार मतदाराने केली मात्र मतदाराच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्याने स्वतः परस्पर भाजपला मतदान केल्याचा मतदार आणि अपक्ष उमेदवाराचा आरोप आहे.
Navi Mumbai News : मतदार यादीत वनमंत्र्यांचं नाव सापडेना! या केंद्रावरुन त्या केंद्रावर पळापळ..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world