
संजय तिवारी, प्रतिनिधी
विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशननं नागपूरमधील पेट्रोल आणि डिझेल पंपाववर 10 मे पासून डिजिटल पेमेंट्स स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला होता. डिजिटल क्षेत्रातील व्यवहार सर्वत्र वाढले असताना घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्याचे नागपूरमध्ये प्रतिसादही उमटले होते. अखेर हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय लष्करानं पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सामान्य जनतेस त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांची मोठी अडचण दूर झाली आहे. त्यांना यापूर्वीसारखेच डिजटल पद्धतीनं पेमेंट करता येणार आहे.
का घेतला होता निर्णय?
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोलपंप धारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जात होती. त्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला. सध्या देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही.
( नक्की वाचा : गडचिरोलीकरांना मिळणार थेट ऑस्ट्रेलियन विद्यापीठाकडून शिक्षण, राज्य सरकारनं केला मोठा करार )
ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत होती. त्याचाच भाग म्हणून 10 मे पासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world