जाहिरात

Nagpur Vande bharat: नागपूर-पुणे 'वंदे भारत' पहिल्याच दिवशी लेट, 'या' कारणामुळे कोलमडलं वेळापत्रक

Nagpur Vande Bharat Train: या वंदे भारत एक्स्प्रेसने नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या  8 तासात होणार असल्याने  प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण, पहिल्याच दिवशी या रेल्वेला लेट मार्क पडला.

Nagpur Vande bharat: नागपूर-पुणे 'वंदे भारत' पहिल्याच दिवशी लेट, 'या' कारणामुळे कोलमडलं वेळापत्रक
मनमाड, नाशिक:


निलेश वाघ, प्रतिनिधी

Nagpur Vande Bharat Train: नागपूर-पुणे हे या राज्यतील बहुचर्चित वंदे भारत ट्रेनला आजपासून ( रविवार, 10 ऑगस्ट) सुरुवात झाली. राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांना चांगलीच उत्सुकता आहे. 

नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसने नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या  8 तासात होणार असल्याने  प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण, पहिल्याच दिवशी या रेल्वेला लेट मार्क पडला. नागपूर - पुणे वंदेभारत एक्सप्रेसचे मनमाड रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.स्थानिक  खासदार,आमदार अनुपस्थित असल्यानं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली

सकाळी नागपूर येथून सुटलेल्या या  ट्रेन चे विविध स्थानकावर स्वागत करण्यात आल्याने तब्बल 2 तास उशिराने वंदे भारत एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली. या स्वागत कार्यक्रमामुळेच पहिल्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेसला लेट झाला. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. 

( नक्की वाचा : Indian Railway Offer : आता रेल्वे तिकिटाच्या दरापेक्षा कमी पैसे मोजावे लागणार, भारतीय रेल्वेची जबरदस्त ऑफर )

वंदे भारत ट्रेनचा मार्ग आणि स्टॉप

रविवारपासून सुरु झालेली वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी 9.50 वाजता सुटेल आणि रात्री 9.50 वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन धावणार नाही. पुण्याहून ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता सुटून, संध्याकाळी 6.25 वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

प्रवासाचे भाडे किती?

प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार ही ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे 1500 रुपये तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3500 रुपये असणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com