पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही वेगवान कारचा कहर, अल्पवयीन मुलानं 5 जणांना उडवलं

पुण्यात भरधाव पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अद्याप ताजी आहे. पुण्यातील या घटनेची नागपूरमध्ये पुनरावृत्ती झालीय.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूरमध्ये अल्पवयीन मुलानं हा अपघात केला आहे.
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

पुण्यात भरधाव पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अद्याप ताजी आहे. या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन आहे. पुण्यापाठोपाठही नागपूरमध्ये वेगवान कारनं 5 जणांना उडवलंय. नागपुरातील नंदनवन परिसरात एका स्कोडा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 जणांना धडक दिली. पुण्याप्रमाणेच या कारचा चालकही अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नंदनवन पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोपट धायतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.30 वाजता हा प्रकार घडला. या अघातात जखमी झालेल्या दोन जणांवर अद्यापही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर, तिघांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी दिली आहे. बसंती गोंड, गोलू शाहू,मिश्रा,कार्तिक अशी या अपघातामधील जखमींची नावं आहेत. 

( नक्की वाचा : नागपूर हादरलं, स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 5 ठार 5 जखमी )

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं स्कोडा कार ची चावी घेऊन ती चालविल्याने नागपुरात हा अपघात घडला. ब्रेकऐवजी त्याचा पाय ॲक्सिलेटरवर पडल्याने कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला स्कोडा धडकली, असा या अल्पवयीन मुलाचा दावा आहे. 

नागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून गॅरेज मालक आणि स्कोडा कार मालकाचीही चौकशी सुरू आहे, असं धायतोडे यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement
Topics mentioned in this article