हवाई प्रवासासाठी प्रवासी रेल्वेच्या तुलनेत अधिक पैसे खर्च करतात. आरामदायी प्रवास आणि वेळ वाचण्याच्या दृष्टीने हवाई प्रवास नागरिकांसाठी सोयीचा असतो. मात्र पैसे खर्च करूनही जर प्रवाशांना त्रासदायक प्रवास करावा लागला तर...? यापूर्वीही अनेकदा हवाई प्रवासातील कमतरता अधोरेखित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. नागपूरहून इंडिगोच्या विमानाने पुण्याला जाणाऱ्या बारामतीतील एका डॉक्टरांची मोठी गैरसोय झाली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी विमानातील इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. सुजित अडसूळ असं त्यांचं नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दरवर्षीप्रमाणे सर्जिकल कॅम्पसाठी गडचिरोलीला गेले होते. परतण्यासाठी त्यांनी नागपूरहून पुण्याला येणारं इंडिगोचं फ्लाइट घेतलं. सुरुवातीलाच या विमानाच्या सीटचा काहीतरी गोंधळ असल्याचं त्यांचं लक्षात आलं. त्यांनी वारंवार कर्मचाऱ्यांना सांगितलं. मात्र कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचं डॉ. सुजित अडसूळ यांनी सांगितलं. शेवटी पुणे आल्यानंतर उतरत असताना सीट अक्षरश : तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सीटचा वरील भाग निखळून हातात आला होता. डॉ. सुजित यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओही शूट केला आहे.
नक्की वाचा - Dog Care Centre : किळसवाणं कृत्य! डॉग केअर सेंटरमध्ये श्वानाचा डोळा फोडला, दुसरा मानसिक धक्क्यात!
डॉ. सुजित यांनी या घटनेचा संताप व्यक्त केला. इंडिगो इतकं बेजबाबदार कसं असू शकतं? जर बेसिक सुविधेकडे लक्ष दिलं जात नसेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे काय लक्ष देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक प्रवासी रात्रंदिवस एअर कंपनीच्या भरवशावरती प्रवास करतात. परंतु अशा प्रकारचा प्रवास म्हणजे एखाद्या वडापमध्ये बसल्यासारखं वाटतं याची नोंद घ्यावी. या सर्व प्रकारानंतर त्यांनी पुणे एअरपोर्टच्या प्रतिनिधींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीप्रमाणे आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं डॉ. सुजित अडसूळ यांनी सांगितलं. .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world