काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? स्वतः नाना पटोलेंनी खुलासा केला; म्हणाले...

महायुतीच्या या लाटेत काँग्रेसला फक्त जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, दिल्ली: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गजांचा दारुण पराभव झाला. महायुतीच्या या लाटेत काँग्रेसला फक्त जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी  अमित देशमुख यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत आता स्वतः नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीमध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजीनाम्यावरुन महत्वाचे विधान केले आहे.

नक्की वाचा: भाजपचं ठरलं! राज्यात पुन्हा 'देवेंद्र' सरकार? फडणवीस दिल्लीला रवाना

काय म्हणाले नाना पटोले? 

 'रमेश चेनिथाल्ला आणि मी राज्याच्या विधानसभेबाबत चर्चा केली. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला अनपेक्षित आहे. यामध्ये शुक्राचार्य कोण आहे, हे तपासावे लागेल. आम्ही सर्व कार्यकर्ते ताकतीने कामाला लागलो होतो. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठीही
हा निक्काल धक्कादायक आहे. त्यांच्याशी जवळपास पाऊण तास चर्चा झाली. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु..' असं नाना पटोले म्हणाले. 

तसेच  काँग्रेस पक्षाला जनतेची भूमिका घेऊन लढणार आहे. या बैठकीत  प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही किंवा त्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. असे म्हणत त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा फेटाळून लावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचे विधान केले. देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं ते म्हणाले. 

महत्वाची बातमी: वारसदार, अजितदादा! साहेबांचे 10 आमदारही फुटणार? 'त्या' बॅनरमुळे रंगल्या चर्चा

दरम्यान, महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Advertisement