सुनेत्रा पवारांसाठी मोदी आणि भाजपचा मोठा प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर इथल्या लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही फोडाफोड बारामतीच्या जनतेला पटली का ? बारामतीमध्ये शरद पवारांचे वर्चस्व संपले का ?अजित पवार हेच शरद पवारांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी आहेत का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बारामतीच्या निकालातून मिळणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

देशातील सगळ्यात लक्ष्यवेधी लढतींपैकी एक असलेली लढत म्हणजे बारामतीची. नणंद विरूद्ध भावजय असा सामना इथे रंगणार आहे. इथल्या जय-पराजयावर पवार कुटुंबातीलच दोन प्रमुख व्यक्तींचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. सुप्रिया सुळे यांना विजयी करणे हे शरद पवारांसमोर लक्ष्य असणार आहे तर आपल्या पत्नीला विजयी करणे हे शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर इथल्या लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही फोडाफोड बारामतीच्या जनतेला पटली का ? बारामतीमध्ये शरद पवारांचे वर्चस्व संपले का ?अजित पवार हेच शरद पवारांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी आहेत का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बारामतीच्या निकालातून मिळणार आहेत.   

बारामती जिंकणे सोपे नाही अजित पवारांना चांगलेच ठावूक आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बारामती मतदारसंघ हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही जिंकता आलेला नव्हता. ही बाब भाजपला सातत्याने सलते आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना आपल्या बाजूला वळते केले असून पवार कुटुंबातीलच व्यक्ती निवडणुकीत उतरेल याची खात्री करून घेतली आहे. मात्र तरीही ही लढाई अजित पवार आणि भाजपसाठी सोपी नाही. सुप्रिया सुळे यांची संसदेतील चांगली कामगिरी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना असलेली सहानुभूती, पक्ष फुटीनंतर त्यात झालेली वाढ ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जमेच्या बाजू आहेत.   अजित पवार यांची काम करण्याची शैली, त्यांच्या पाठीशी असलेली कार्यकर्त्यांची फळी, सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य आणि भाजपची त्यांना मिळालेली साथ या सुनेत्रा पवारांसाठी जमेच्या बाजू आहेत.   

Advertisement

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 5 जागा वगळता शिवसेना आणि भाजप युतीने महाराष्ट्रातील सगळ्या जागा जिंकल्या होत्या. यातील चंद्रपूर, बारामती आणि शिरूर या तीन जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत होत आहे. याच मतदारसंघापासून नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासाठीच्या प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे बारामतीमध्ये देखील जाहीर सभेला संबोधत करणार आहे.

Advertisement

संपूर्ण देशातील अटीतटीच्या आणि लक्ष्यवेधी लढतींपैकी बारामतीची लढत बनली आहे. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करणे हे सोपे नाही. शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद इथे पणाला लावली आहे.  6 एप्रिल रोजी एका सभेत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची लढत ही मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे असे म्हणत इथल्या लढतील स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच पुढचा प्रयत्न म्हणून नरेंद्र मोदी यांची इथे सभा आयोजित केली जाणार आहे.

Advertisement

ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे, जे मतदारसंघ आजवर जिंकता आले नव्हते अशा मतदारसंघात भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. मोदी ज्या मतदारसंघात सभा घेतात त्या मतदारसंघातील उमेदवार जिंकण्याची शक्यता वाढते असे भाजप नेत्यांना वाटते आहे यामुळे भाजपने मोदी यांच्या सभांचे नियोजन केले आहे. मोदी हे सभांसोबतच महाराष्ट्रात रोड शो देखील करणार आहेत.  

Topics mentioned in this article