जाहिरात

Nashik Crime: 'खरात फाईल्स'पेक्षाही मोठं स्कँडल! एका खंडणीने भांडाफोड, तब्बल 200 अश्लील VIDEO अन्...

धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या टॅबमध्ये १५० ते २०० व्हिडिओ असल्याचे समोर आल्याने खरात प्रकरणापेक्षाही मोठे स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

Nashik Crime: 'खरात फाईल्स'पेक्षाही मोठं स्कँडल! एका खंडणीने भांडाफोड, तब्बल 200 अश्लील VIDEO अन्...

राहुल वाघ, नाशिक:

Ashok Kharat Case:  अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहरातील एका व्यावसायिकाला त्याचा टॅब चोरी करुन त्यामधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दहा हजारांची खंडणी स्विकारताना  आकाश वखरे ,प्रकाश पानपाटील ,सुरज गवई, श्रीपत शिंदे या चौघांना ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या टॅबमध्ये १५० ते २०० व्हिडिओ असल्याचे समोर आल्याने खरात प्रकरणापेक्षाही मोठे स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

Crime News: ZP कार्यालयात भयंकर प्रकार! स्कॉलरशिपच्या नावाखाली विध्यार्थीनिशी नको ते केलं, मुलीने घडवली अद्दल

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून त्यातील सर्व डेटा मिळवत मैत्रिणीसोबत असलेले त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी १२ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या संशयिताविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या खंडणीपैकी १० हजार रुपयांची रक्कम स्विकारताना पोलिसांनी चार संशयितांना पकडले. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून भोंदू खरात प्रकरणापेक्षाही गंभीर सेक्स स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मोबाइलवर फोन आला. 'मला ७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये द्या व तुमचा टॅब घेऊन जा अशी धमकी त्यांना देण्यात आली.

 टॅबमध्ये 150-200 व्हिडिओ..! 

या धमकीनंतर व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सातपूर पोलिसांनी काही वेळातच संशयित आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना ताब्यात घेतले.  दरम्यान, प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तक्रारदारावरही संशय व्यक्त करण्यात येत असून, मोठे सेक्स स्कँडल उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Ashok Kharat :130 बँक खाती, 60 कोटी अन् 'वारस' मात्र एकच! भोंदू खरातचा बँकिंग विश्वातील मोठा घोटाळा उघड

Listen to the latest songs, only on JioSaavn.com