Nashik Crime: नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये महिलांवर धर्मांतरांचा दबाव टाकत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ तर देवळाली पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जबरदस्तीने अत्याचार, नमाज पठण करायला लावणे, इच्छेविरुद्ध नॉन खायला देणे, धर्मांतरणला दबाव टाकणे असे आरोप आहेत. 9 पैकी एक पुरुष असुन त्याच्यावर देखिल धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला होता. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वेषांतर करुन कंपनीमध्ये जात याप्रकरणाचा भांडाफोड केल्याचं समोर आले आहे.
VIDEO: लंगडत लंगडत आला, हात जोडून नारा दिला, अत्याचारी एरंडेची पोलिसांनी केली 'अशी' अवस्था
केरळ स्टोरी सारखं ऑपरेशन!
नाशिकमधील मल्टी नॅशनल कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी गोपनीय कारवाई केल्याचं समोर आले आहे. या गुन्हेगारांवर गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांचा वॉच होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम यासाठी तैनात होत्या. या महिला पोलीस अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेऊन होत्या. यामध्ये काही महिला वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेशांतर करून कंपनीत दाखल झाल्या.
कंपनीत वेषांतर करुन गेलेल्या महिल पोलिसांनी आरोपींवर लक्ष ठेवले. नराधम आरोपींचे पीडितांशी अश्लील हावभाव, आरोपी महिलांशी करत असलेले गैरवर्तन वेशांतर केलेल्या महिला पोलिसांनी पाहिले. महिला पोलिसांनी मीटिंगदरम्यान आरोपींचे गैरवर्तन प्रत्यक्ष पकडले. त्यानंतर शिताफीने कारवाई करत नराधमांना बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून 40 हुन CCTV फुटेजची तपासणी करत ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.
आणखी एक धक्कादायक खुलासा
दरम्यान, या बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणातील आरोपीने स्वतःचे पहिले लग्न झाल्याचे लपवत खोटे बोलून पिडीत तरुणीसोबत संबंध ठेवल्याचं समोर आले आहे. या आरोपीला आधीपासून एक पत्नी आणि दोन मुले असल्याचे समजताच पिडीत महिलेला धक्का बसला होता. या आरोपीने धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही महिलेचा आरोप आहे. अशाप्रकारे काम करणारं एक मोठं रॅकेटच कार्यरत असल्याचा संशय असून SIT कडून अधिक तपास सुरू आहे.
Crime News: आईचं अफेयर, बापाचा अडथळा.. चौघांनी मिळून रचला भयंकर कट; सांगलीत खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world