राहुल वाघ, नाशिक:
Nashik Ravindra Erande News: भोंदु अशोक खरातनंतर नाशिकमध्ये कथित पत्रकार रवींद्र एरंडेचे अश्लील कांड प्रकरण समोर आलं आहे. अशोक खरात प्रमाणेच रवींद्र एरंडेचेही 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. नोकरीचं आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या विकृताला आता नाशिक पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला आहे. अशोक खरात प्रमाणेच एरंडेचाही व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणताना दिसत आहे.
Crime News: आईचं अफेयर, बापाचा अडथळा.. चौघांनी मिळून रचला भयंकर कट; सांगलीत खळबळ
अत्याचारी एरंडेला पोलिसांचा प्रसाद!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातपूर सेक्स कॅण्डल प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. कथित पत्रकार रवींद्र एरंडे याला नाशिक पोलिसांनी प्रसाद देत कायद्याचा धडा शिकवला आहे. सुरुवातीला एरंडे पोलीस तपासात सहकार्य करत नव्हता, मात्र पोलिसांनी प्रसाद देताच एरंडेनेही नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असा नारा दिला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवींद्र एरंडेला धड चालताही येत नसल्याचे दिसत असून हात जोडून तो नारा देत आहे. अशोक खरात प्रमाणेच या अत्याचारी नराधमालाही नाशिक पोलिसांनी कायद्याचा धाक काय असतो हे दाखवून दिलं आहे.
आणखी एक गुन्हा दाखल
दरम्यान, महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. रवींद्र एरंडे याने नोकरीचे आमिष दाखवून नऊ लोकांची 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या चौकशीत रविंद्र एरंडे याच्या घरातून बनावट नियुक्तीपत्रही जप्त केले आहे. या फसवणुकीतरवींद्र एरंडे याने निम्मे रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहितीही समोर आली आहे.
आज दुपारी रवींद्र एरंडे याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार केले जाणार आहे. याआधी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने एरंडेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world