जाहिरात

Ashok Kharat : 15 लाख...! कामोत्तेजक-लैंगिक शक्ती वाढवणारं परीने आणलेलं मध; भोंदू अशोक खरातचं आणखी एक प्रकरण

लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांना अशोक खरात या मधाचं महत्व पटवून द्यायचा आणि विक्री करायचा.

Ashok Kharat : 15 लाख...! कामोत्तेजक-लैंगिक शक्ती वाढवणारं परीने आणलेलं मध; भोंदू अशोक खरातचं आणखी एक प्रकरण

Ashok Kharat : 20 फुटांचा रिमोटवर चालणारा नाग, १ लाखांचे चिंचोके, कोल्ह्याचे कान, मंतरलेले खडे, ओश्नो जल... या सीरिजमधला भोंदूबाबाचा पुढचा प्रकार आहे एल्विश मध. अशोक खरात एल्विश नावाचं मध तब्बल १५ लाख रुपयांना विकायचा. हे मध लैंगिक शक्ती वाढवणारं आहे, असं सांगून अशोक खरात अनेकांना हे मध घ्यायला लावायचा. याच अशोक खरातबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे अशोक खरात विद्यार्थिनींवरही लैंगिक अत्याचार करायचा आणि त्याच मुलींना धनिकांकडेही पाठवून द्यायचा. खरातच्या या नव्या काळ्या कारनाम्यांबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट.

कामोत्तेजक आणि लैंगिक शक्ती वाढवणारं मध

भोंदूबाबा अशोक खरात तुर्कीच्या मधाची विक्री करीत होता. कामोत्तेजक आणि लैंगिक शक्ती वाढवणारं मध विकून भल्याभल्यांना बाबाने गंडा घातला. जगात मधाच्या जवळपास ३० जाती आहेत. त्यापैकी भोंदूबाबाची आवडती मधाची जात म्हणजे तुर्कीमधला एल्विश नावाचं मध. हा भोंदूबाबा एल्विश मध विकून अनेकांना गंडा घालायचा. जागतिक बाजारात हे १ किलो एल्विश मध ९ लाखांना मिळतं. अशोक खरात हेच एक किलो मध तब्बल १५ लाखांना विकायचा. एल्विश म्हणजे परी...परीनं आणलेलं मध म्हणून हे एल्विश मध. 

नक्की वाचा - Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने पीडितांवर अत्याचार कसे केले? पहिल्यांदाच भयंकर तपशील आला समोर

  
तुर्कीमध्ये काळ्या समुद्राजवळ हे एल्विश मध सापडतं. तुर्कीतल्या समुद्राजवळच्या खोल गुहांमध्येच हे मध सापडतं. कॅकेशियन ग्रे जातीच्या मधमाशा हे मध गोळा करतात. या मधमाशांची जीभ लांब असल्यानं त्या फुलाच्या आतल्या भागातलं मध गोळा करू शकतात. वर्षातून एकदाच हे मध गोळा केलं जातं. एल्व्हिश मध हे जगातला सगळ्यात शुद्ध मध समजलं जातं. दुर्मिळ, गुणवता आणि चवीसाठी हे मध जगभरात प्रसिद्ध आहे. या मधाची किंमत किलोमागे तब्बल ९ लाख एवढी आहे. 

 ९ लाखांचं मध १५ लाखांना

अशोक खरात हे एल्विश मध आणून विकायचा. अशोक खरात ९ लाखांचं मध १५ लाखांना विकायचा. १५ लाख रुपये किलो एवढं मध विकताना त्यात अशोक खरात भेसळ करायचा, असाही संशय आहे. खास करून लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांना अशोक खरात या मधाचं महत्व पटवून द्यायचा आणि विक्री करायचा. कामोत्तेजक आणि लैंगिक शक्ती वाढवणारं मध विकून भोंदूबाबा अशोक खरातनं भल्याभल्यांना गंडा घातला आहे. 

१५ लाखांचा मध विकून मिळालेली कोट्यवधींची रक्कम खरात त्याच्या ट्रस्टच्या नावावर जमा करायचा. त्यामधूनच काळा पैसा पांढरा करायचा असा संशय आहे. अशोक खरातबद्दल आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नराधम अशोक खरात विद्यार्थिनींशीही गैरवर्तन करायचा. धार्मिक विधी, लग्न जमवून देणं, पूजाविधी, भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं तो विद्यार्थिनींवरही अत्याचार करत होता. खरात महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यानंतर त्या महिलांना श्रीमंत पुरुषांसोबतही लैंगिक संबंध ठेवायला जबरदस्ती करायचा, असाही आरोप आहे. 

१५ लाखांचं मध, ओश्नो जल, चिंचोके, मंतरलेले खडे, कोल्ह्याचे कान, सुगंधी कस्तुरी, वाघाचं कातडं आणि रिमोट कंट्रोलचा नाग.... असे चमत्कार दाखवत लोकांच्या अंधश्रद्धेचा खरातनं गैरफायदा घेतला आणि त्यातून तो मालामाल झाला. तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली खरातची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून खरातबद्दलच्या आणखी धक्कादायक गोष्टी बाहेर येतील.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com