Nashik Politics: नवरा ठाकरे गटात अन् बायको शिंदे गटात! सासऱ्याविरोधात मैदानात उतरणार

शिवसेना शिंदे गटानेही ठाकरे गटाला धक्का दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांची पत्नी किरण गामने दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिक: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महापालिका निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. एकीकडे सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेत भाजपने ठाकरेंना जोर का झटका दिला असतानाच आता शिवसेना शिंदे गटानेही ठाकरे गटाला धक्का दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांची पत्नी किरण गामने दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Husband in Shivsena Thackeray Group Wife in Shinde Group)

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेकडून एका मागोमाग एक धक्के दिले जात असून 3 माजी नगरसेवकांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यात सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना काळ फासण्याचा ईशारा देणारे ठाकरे गटाचे उप महानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी किरण दराडे यांचाही समावेश आहे.

ठाकरे गटाच्या नाशिकमधील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविका किरण बाळा दराडे, नाशिक महापालिकेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगले, माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातमी - 'बायकोला गळ्यातील पोत घ्यायचीये', 93 वर्षांच्या वृद्धाने पिशवीत हात घातला अन्...; अंगावर काटा आणणारा Viral Video

दरम्यान यावर बोलतांना बाळा दराडे यांनी माझ्या सासऱ्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. गेल्यावेळी महिला आरक्षण असल्याने माझ्या पत्नीने निवडणूक लढवली होती मात्र आता सासऱ्यांना निवडणूक लढवण्याची ईच्छा असल्याने त्यांनी माझ्या बायकोसह शिंदे गटात प्रवेश केल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मी स्वतः ठाकरेंसोबतच राहणार आहे, सासऱ्यांविरोधात निवडणूक लढवेल. काँगेसची साथ मान्य नसल्याने अनेक जण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचेही बाळा दराडे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी