सुरेश दास/नवी मुंबई
APMC Fruit Market: शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहावे, यासाठी हल्ली प्रत्येक जण व्यायाम करण्यासह आपल्या आहाराचीही पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत. यामुळेच प्रत्येकाच्या डाएटमध्ये फळे-भाज्यांचा समावेश वाढला आहे. घरासह-ऑफिसच्या कामामुळे दिवसभरात कितीही धावपळ झाली तरीही हल्ली प्रत्येक खाण्यापाण्याच्या वेळा कटाक्षाने पाळतात. यामध्येही नैसर्गिक खाद्यपदार्थांद्वारे आरोग्यास जीवनसत्त्वांचा पुरवठा व्हावा, यासाठी फळांचे सेवन करण्यावर फिटनेस फ्रीक मंडळी भर देत आहेत. म्हणूनच फळांची मागणी वाढत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये देखील देशी फळांसह परदेशातील फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार वेगवेगळ्या प्रकारची फळे विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाजारात येणारी परदेशी फळे ग्राहकांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरत आहेत. देशपरदेशांतून येणाऱ्या फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्यास पोषक असणारी ही फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक मार्केटमध्ये गर्दी करताहेत.
सध्या आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे हापूस, पायरी, लालबाग आणि बदाम यासह आंब्यांच्या विविध जाती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
परदेशी फळांची वाढती मागणी
इराणी सफरचंद, इजिप्त संत्री, पॅकम पेर, रासबेरी तर टर्कीवरून गुणकारी फणस बाजारामध्ये आले आहे. रसाळ आणि मधुमेहग्रस्तांसाठी हे फणस फायदेशीर असल्याने परदेशी फणसाला मोठी मागणी असल्याचे व्यपाऱ्यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या मार्केटमधील फळांच्या किंमती
- इराणी सफरचंद 110 रुपये ते 130 रुपये प्रति किलोग्रॅम
- हापूस आंबा 300 ते एक हजार रुपये डझन
- कर्नाटक, बदाम, केशर आंबा 80 ते 100 रुपये प्रति किलोग्रॅम
- संत्री 30 ते 45 रुपये प्रति किलोग्रॅम
- पेरू 40 ते 55 रुपये प्रति किलोग्रॅम
- पपई 25 ते 35 रुपये प्रति किलोग्रॅम
- मोसंबी 40 ते 50 रुपये प्रति किलोग्रॅम
- केळी 40 ते 50 रुपये प्रति किलोग्रॅम
- चिकू 20 ते 25 रुपये प्रति किलोग्रॅम
- डाळिंब 80 ते 130 रुपये प्रति किलोग्रॅम
- इजिप्तचे संत्री 80 रुपये प्रति किलोग्रॅम
- पेर 150 ते 180 रुपये प्रति किलोग्रॅम
- द्राक्षे 60 ते 80 रुपये प्रति किलोग्रॅम
- काळी द्राक्षे 60 ते 80 रुपये प्रति किलोग्रॅम
- कलिंगड 25 ते 18 रुपये प्रति किलोग्रॅम
- अंजीर 80 रुपये प्रति किलोग्रॅम
परदेशी फळांचे दर
- टर्की, वॉशिंग्टन, इराण सफरचंद 180 ते 220 रुपये प्रति किलोग्रॅम
- पेर 120 ते 140 रुपये प्रति किलोग्रॅम
- चिलीतील लाल द्राक्षे 400 रुपये प्रति किलोग्रॅम
- इजिप्त संत्री100 ते 120 रुपये प्रति किलोग्रॅम
- ॲव्हाकॅडो 250 रुपये प्रति किलोग्रॅम
- इराणी किवी 200 रुपये प्रति किलोग्रॅम
- ब्लु-बेरी एक हजार रुपये प्रति किलोग्रॅम
आणखी वाचा
Health Tips: नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा
Health Tips: चुकीच्या पद्धतीने खाताय पालक? आरोग्यावर होतील दुष्परिणाम