Navi Mumbai Crime: 'मतदान झाले, मी तुझा तू माझी...' महिलेसोबत भयंकर घडलं; 2 घटनांनी नवी मुंबईत खळबळ

फिर्यादी महिला ही पालिकेच्या शाळेसमोरून जात असताना आरोपी अशोक रणबावळे याने तिला उद्देशून लज्जास्पद वक्तव्य केले

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Crime: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे सत्र सुरु आहे. नवी मुंबईमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून उरणमध्ये १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

उरण परिसरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १३ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी पीडित मुलगी आपल्या घराकडे जात असताना, आरोपी इन्जामुल करमुल शेख (वय २६) याने तिचा पाठलाग केला आणि श्रीयोग अपार्टमेंटजवळ तिला अडवून अश्लील वक्तव्य केले. 

नक्की वाचा - Beed News: देव दर्शनासाठी घेऊन गेले, बीडच्या महिलांना पुण्यात बोगस मतदान करायला लावले, पुढे जे घडले...

त्यानंतर त्याच रात्री ८:३० च्या सुमारास, मुलगी दूध घेऊन घरी परतत असताना आरोपीने पुन्हा तिचा पाठलाग करून डोळा मारला आणि तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. ​पीडितेच्या नातेवाईकांनी या घटनेची तक्रार दिल्यानंतर उरण पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे करत आहेत.

तुर्भे परिसरात 45 वर्षीय महिलेचा विनयभंग...

दुसरीकडे, तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ वर्षीय व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भा.दं.वि. च्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी महिला ही पालिकेच्या शाळेसमोरून जात असताना आरोपी अशोक रणबावळे याने तिला उद्देशून लज्जास्पद वक्तव्य केले

Advertisement

 "आता मतदान झाले असून, मी तुझा व तू माझी" असे बोलून त्याने महिलेच्या विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७९ आणि भा.दं.वि. कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मालुसरे करत आहेत. या गुन्ह्यासाठी कमाल ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

Pune News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली