
- अक्टूबर में नवी मुंबई और नोएडा के अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करेंगे
- नवी मुंबई एयरपोर्ट का पहला चरण 19647 करोड़ रुपये की लागत से बना और 2 करोड़ यात्रियों की क्षमता रखता है
- नोएडा एयरपोर्ट का पहला चरण एक रनवे और टर्मिनल के साथ 1.2 करोड़ यात्रियों को सेवाएं देगा
Navi Mumbai International Airport: देशातील विमान वाहतूक सेवांचे चित्र लवकरच बदलणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या विमानतळांवरील सोयीसुविधा लंडन देशातील हीथ्रो विमानतळ आणि न्यूयॉक विमानतळाच्या तोडीसतोड असणार असल्याचे म्हटलं जातंय. यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 8 ऑक्टोबर तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Jewar) 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळाहून प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्यात आलीय तर जेवरच्या नोएडा विमानतळासाठी बुकिंग सेवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
देशातील दोन मोठे विमानतळ
दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ, मुंबईचे छत्रपती शिवाजी विमानतळ आणि बंगळुरू विमानतळांसह ही दोन्ही एअरपोर्ट देखील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेस भारत देशाला अव्वल स्थानी आणतील. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फ्लाइट ऑपरेशनसाठी एअरोड्रम लायसन्स आधीच जारी केलंय तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लवकरच हा परवाना मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वैशिष्ट्य
- 1160 हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात आलेले विमानतळ
- पहिल्या टप्प्यात दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील
- विमानतळाचा पहिला टप्पा 19,647 कोटी रुपये खर्च करुन पूर्ण
- 4 टर्मिनल्ससह 9 कोटी प्रवाशांची क्षमता
- 32.5 लाख मालवाहतुकीची क्षमता
- इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा विमान कंपन्या सेवा देण्यास सज्ज
अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी 2 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांच्या तयारीचा आढावा घेतला होता. NMIA हा अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा संयुक्त उपक्रम आहे, ज्यामध्ये AAHLची 74 टक्के भागीदारी आहे.

Navi Mumbai
नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी लोकार्पण
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाच टप्प्यांमध्ये उभारण्यात येणार आहे.
- पहिल्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी प्रवास करतील.
- विमानतळ पूर्णपणे तयार झाल्यानंतर वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करतील.

Navi Mumbai
नोएडा विमानतळावर वाहतूक सेवा कधीपासून सुरू होणार?
- नोएडा विमानतळावरील वाहतूक सेवा 45 दिवसांच्या आत सुरू होणार असल्याची माहिती आहे.
- पहिल्या टप्प्यात रनवे आणि एक टर्मिनल इमारती उभारण्यात आलीय. वर्षाला 1.2 कोटी प्रवासी येथून प्रवास करू शकतील.
- चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाला 7 कोटी प्रवासी येथून प्रवास करतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world