जाहिरात

Navratari 2025: अवघ्या 3 मिनिटात 'असे' घ्या सप्तश्रृगींचे दर्शन! 500 पायऱ्या चढण्याचे कष्ट झाले कमी

Navratri 2025: महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'फनिक्युलर ट्रॉली'मुळे आता हे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी देवीचे दर्शन सुखकर झाले आहे.

Navratari 2025: अवघ्या 3 मिनिटात 'असे' घ्या सप्तश्रृगींचे दर्शन! 500 पायऱ्या चढण्याचे कष्ट झाले कमी

निलेश वाघ, प्रतिनिधी| नाशिक

Navratri 2025 Funicular Trolley Service On Saptashrungi Gad:   शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर लाखो भाविक आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. डोंगर कपारीत वसलेल्या या देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना तब्बल ५०० अवघड पायऱ्या चढून जावे लागते. मात्र, महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'फनिक्युलर ट्रॉली'मुळे आता हे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी देवीचे दर्शन सुखकर झाले आहे.

सुयोग गुरुबक्षानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून गेल्या आठ वर्षांपासून ही सेवा पुरवली जात आहे. या ट्रॉलीमुळे अनेक भाविकांना कोणत्याही शारीरिक श्रमाशिवाय देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. विशेषतः ज्यांना पायऱ्या चढणे शक्य नाही, अशांसाठी ही सुविधा वरदान ठरली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन फनिक्युलर ट्रॉली सेवा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली असून, नवरात्रीच्या नऊ दिवसांत ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे. यामुळे एकाच वेळी अनेक भाविकांना कमी वेळेत देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

Pune News: पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! दोन तरुणांना 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी अद्दल घडवणारी शिक्षा

फ्युनिक्युलर ट्रॉलीचे फायदे: |Funicular Trolley Service Importance 

सुलभता: ५०० पायऱ्या चढण्याचा त्रास वाचून भाविक सहजपणे गडावर पोहोचू शकतात.
वेळेची बचत: ट्रॉलीमुळे काही मिनिटांतच गडावर पोहोचता येते.
सोयीस्कर प्रवास: वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा प्रवास सोयीस्कर आहे.
गर्दीचे व्यवस्थापन: जास्त भाविक असतानाही गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

सप्तश्रृंगी येथे फ्युनिक्युलर ट्रॉलीचे महत्त्व| |Funicular Trolley Service Benifit On Saptashrungi Gad

सध्या सप्तश्रृंगी गडावर नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. नवरात्रीला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या ट्रॉली सेवेमुळे त्यांची सोय होते. भारतातील ही पहिलीच फ्युनिक्युलर ट्रॉली आहे, जी सप्तश्रृंगी गडावरील मंदिरापर्यंत पोहोचवते. २ जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण झाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com