जाहिरात

अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल; आतापर्यंत किती वेळा झालेत गायब?

दादांच्या नॉट रिचेबल होण्याचा हिशोब केला, तर आतापर्यंत सात ते आठ वेळा दादा नॉट रिचेबल झालेत.

अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल; आतापर्यंत किती वेळा झालेत गायब?
मुंबई:

मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे दिसले नाही. नागपूर अधिवेशन सुरू झाल्यापासूनच अजित पवार नॉटरिचेबल आहेत. सध्या अजित पवार गायब असण्यामागे भुजबळांचं कारण असल्याची चर्चा आहे. मात्र नॉटरिचेबल होण्याची अजित पवारांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कितीतरी वेळा अजित पवार नॉटरिचेबल झालेत. 

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ काय? 

नक्की वाचा - उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ काय? 

यापूर्वी अजित पवार किती वेळा नॉटरिचेबल झालेत?  
2019 मध्ये मविआची सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या. नेहरू सेंटरमध्ये अशीच बैठक सुरू असताना अजित पवार अचानक बैठकीतून उठले आणि गायब झाले. त्यानंतर अजित पवार दिसले ते थेट पहाटेच्या शपथविधीमध्ये. तेही देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेताना. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले की आता राजकीय भूकंप होणार की काय. म्हणून सगळे अलर्ट होतात. 
   
2019ला आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरही अजित पवार असेच गायब झाले होते. नंतर पत्रकार परिषदेत आले आणि भावुक होऊन दादा म्हणाले, मी पण माणूसच आहे...24 ऑक्टोबर 2019 ला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यावेळीही बारामतीतून लक्षणीय मताधिक्यानं निवडून आलेले अजित पवार गायब होते. तीन दिवसांनी समोर आलेल्या अजित पवारांनी आपण आराम करत असल्याचं सांगितलं. सप्टेंबर 2022 मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी मंचावर बसलेले अजित पवार अचानक गायब झाले होते. प्रफुल्ल पटेलांनी भाषणासाठी अजित पवारांचं नावही घेतलं. मात्र अजित पवार आलेच नाहीत. अखेर अजित पवार वॉशरुमला गेलेत, असं सांगून प्रफुल्ल पटेलांनी वेळ मारुन नेली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक आणि शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनातूनही अजित पवार गायब होते. सात दिवसांनी अजित पवार अवतरले आणि म्हणाले, मी परदेशात होतो. 7 एप्रिल 2023 ला म्हणजे अजित पवार भाजपबरोबर जाण्याआधी ३ महिन्यांआधी अजित पवार असेच गायब झाले होते. पुण्यात बारामती हॉस्टेलला बैठका झाल्यानंतर अजित पवार नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा थांबला आणि अजित पवार ताफा सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात एका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला पोहोचले आणि म्हणाले, पित्ताचा त्रास झाला म्हणून घरी जाऊन झोपलो. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाही दादा काही दिवस गायब होते. बऱ्याच दिवशांनी अजित पवार परतले आणि म्हणाले डेंग्यू झाला होता.

एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं

नक्की वाचा - ​​​​​​​एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं

दादांच्या नॉट रिचेबल होण्याचा हिशोब केला, तर आतापर्यंत सात ते आठ वेळा दादा नॉट रिचेबल झालेत. गायब होण्याची ही दादांची स्ट्रॅटेजी असली तरी दादा नॉट रिचेबल झाले की राजकीय भूकंप होतो की काय म्हणून राजकीय वर्तुळाची मोठी धावाधाव होते हे नक्की. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com