Nitesh Rane : "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय

Nitesh Rane : खासदार नारायण राणे यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्येही अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग

Nitesh Rane Speech : नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली आहे. जेवण करत असताना देखील अटक करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाग पाडलं होतं, याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी करुन दिली. वडील नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार. कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला कुणीही सुटणार नाहीत,", असं नितेश राणेंनी बोलून दाखवलं. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला

दहा वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला, पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिलं आहे. मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली, त्यामुळे ते सगलं जुनं पुसलं गेलं आहे. तिसऱ्या कोणालातरी खुश करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं, असं देखील नितशे राणेंना म्हटलं. 

ट्रेंडिंग बातमी - Income Tax विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी 314 कोटींची नोटीस, पुढे काय झालं?

खासदार नारायण राणे यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्येही अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होते. खासदार नारायण राणे, निलमताई राणे, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सुभाष बने यांची प्रमुख उपस्थिती येथे होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Topics mentioned in this article