जाहिरात

Gadchiroli Naxalites: 15 महिन्यांत 400 हून अधिक नक्षल्यांचा खात्मा; नक्षलवादी घाबरले, केंद्र सरकारपुढे चर्चेचा प्रस्ताव

केंद्र सरकार आदिवासींवर अत्याचार करते आहे, निष्पापांना पोलीस आणि सशस्त्र दले त्रास देत असल्याचे म्हणत गळा काढला आहे.

Gadchiroli Naxalites: 15 महिन्यांत 400 हून अधिक नक्षल्यांचा खात्मा; नक्षलवादी घाबरले, केंद्र सरकारपुढे चर्चेचा प्रस्ताव

 नक्षलवादी चळवळ पूर्णपणे मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कागर सुरू केले होते. या अंतर्गत नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत किमान 400 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईने घाबरलेल्या नक्षलवाद्यांचा संयम सुटू लागला आहे. नक्षलवाद्यांनी आपण केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. नक्षलवाद्यांनी एक पत्रक जारी करून आपण चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या तेलंगाणा विभागाचा प्रवक्ता अभय याने दोन पानी पत्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये सुरुवातीला केंद्र सरकार आदिवासींवर अत्याचार करते आहे, निष्पापांना पोलीस आणि सशस्त्र दले त्रास देत असल्याचे म्हणत गळा काढला आहे. पत्राच्या शेवटी या अभयने म्हटलंय की "जनतेच्या हितासाठी आम्ही शांतता चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही या निमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारसमोर या चर्चेसाठी सकारात्मक वातावरण तयार व्हावे यासाठी प्रस्ताव ठेवत आहोत.

छत्तीसगड, महाराष्ट्र(गडचिरोली), ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये 'कागर' ऑपरेशनच्या नावाखाली सुरू असलेल्या हत्या, सशस्त्र दलांसाठी नव्या छावण्यांची स्थापना थांबवण्यात यावी. जर केंद्र आणि राज्य सरकार या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर आम्ही तातडीने युद्धबंदीची घोषणा करू. " अभय याने बुद्धीजीवी, पत्रकार, लेखक, एनजीओप, आदिवासी आणि दलितांच्या संघटना, विद्यार्थी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणाऱ्यांनी केंद्र तसेच राज्य सरकारवर दबाव टाकावा अशी विनंती केली आहे. यासाठी गल्ली ते दिल्ली मोहीम राबविण्यात यावी असे आवाहनही त्याने केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं

मध्य प्रदेशातील मांडलामध्ये 2 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान...
बुधवारी मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बिचिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाल्याचे मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक कैलास मकवाना यांनी सांगितले. या नक्षलवाद्यांकडे असलेली एसएलआर रायफल, एक साधी रायफल, वायरलेस सेट आणि रोजच्या वापराच्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

6 जिल्हे नक्षलवाद मुक्त झाले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादी चळवळीचा जास्त प्रभाव असलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये या चळवळीचा उपद्रव आता कमी झाल्याचे सांगितले आहे. जास्त प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही चळवळ आता 6 जिल्ह्यांपुरताच उरली असल्याचे त्यांनी सांगितले. 31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन झाले असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. अजूनही या चळवळीचा उपद्रव असलेल्या जिल्ह्यांमध्ये छत्तीसगडच्या बीजापूर, कांकेर, नारायणपूर, सुकमाचा समावेश आहे. झारखंडच्या पश्चिम सिंगभूमचा तर महाराष्ट्रातील गडचिरोलीचाही यात समावेश असल्याचे शाह यांनी सांगितले.