जाहिरात
1 day ago

Operation Sindoor Live Updates: पहलगाम हल्ल्याला 15 दिवस उलटल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे.  भारतीय सशस्त्र दलांनी  ऑपरेशन सिंदूर'* या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत.  ही दहशतवादी ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती. 7 मे रोजी पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी PoK आणि पाकिस्तानमधील 9ते 10 वेगवेगळ्या ठिकाणी  दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 62 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे.  याबाबत 10 वाजता भारतीय लष्कराकडून अधिकृत पत्रकार परिषद घेत माहिती दिली जाणार आहे. 

काश्मीर विद्यापीठाच्या सर्व परिक्षा स्थगित

काश्मीर विद्यापीठाच्या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहे. पाकिस्तावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सध्या काश्मीरच्या सीमा भागात जोरदार गोळीबार सुरू आहे. 

चीनचे भारत पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन

चीनने बुधवारी भारत आणि पाकिस्तानला “शांतता आणि स्थैर्याच्या व्यापक हितासाठी” कमाल संयम पाळण्याचे आवाहन केले आणि या तणावपूर्ण परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायासोबत “सकारात्मक भूमिका” बजावण्याची तयारी दर्शवली आहे. 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर बांग्लादेशची पहिली प्रतिक्रीया

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर बांग्लादेशची पहिली प्रतिक्रीया दिली आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन दिले आहे. "बांग्लादेश सरकार भारत आणि पाकिस्तानमधील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "प्रादेशिक शांतता, समृद्धी आणि स्थिरतेच्या भावनेतून, बांग्लादेशला आशा आहे की राजनैतिक प्रयत्नांद्वारे तणाव कमी केला जाईल आणि या क्षेत्रातील लोकांच्या फायद्यासाठी अखेरीस शांतता प्रस्थापित होईल."

राज्यात वेगवेगळ्या शहरात करण्यात आलं मॉक ड्रिल

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. युद्धजन्य परिस्थितीत आपला बचाव कसा करावा याचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं. 

सैन्याच्या शौर्याला काँग्रेसचा सलाम- मल्लिकार्जून खरगे

भारतीय सैन्याने दाखवलेलं शौर्य आणि राष्ट्रभक्तीला आमचा सलाम आहे अशी प्रतिक्रीया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिली आहे. देशाच्या एकतेसाठी काँग्रेसचे नेहमीच सैन्य आणि सरकारला पाठिंबा राहीला आहे असं ही ते यावेळी म्हणाले. 

भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम- उद्धव ठाकरे

भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील 'स्लीपर्स सेल' उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम ! 

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद

ऑपरेशन सिंदूरनंतर  शरद पवारांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधला आहे.  शरद पवार यांनी ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे.  भारतीय सशस्त्र दलांच्या कारवाईचे कौतुक केले.  त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले.  या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Operation Sindoor LIVE Updates: अमित शहा सीमावर्ती मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार

गृहमंत्री अमित शहा सर्व सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. बैठक दुपारी 2वाजता होणार असून मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त या राज्यांचे पोलिस महासंचालक (DGP) आणि मुख्य सचिव (Chief Secretary) देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. 

या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी बैठक होणार 

•जम्मू आणि काश्मीर (J&K)

•जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल (LG)

•पंजाब

•राजस्थान

•गुजरात

•उत्तराखंड

•उत्तर प्रदेश

•बिहार

•सिक्कीम

•पश्चिम बंगाल

•लडाखचे उपराज्यपाल (LG)

या आपत्कालीन बैठकीत पाकिस्तान सीमेवरील राज्यांबरोबरच नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिव देखील सहभागी होणार.

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरमध्ये किती जणांचा खात्मा? पाकिस्तानने दिले आकडे

भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये किती जणांचा खात्मा झाला याबाबतची माहिती आता पाकिस्तानने सांगितले आहे. भारताकडून 6 ठिकाणी, 24 स्ट्राईक झाले असून यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे बेपत्ता आहेत तर 34  जण बेपत्ता आहेत. 

CM Devendra Fadnavis On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके: CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

भारतीय सैन्यदलाचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक अभिनंदन. अतिशय नियोजनबद्ध

हवाई हल्ला करुन दहशतवाद्यांचे 9 अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. यावेळी व्हिडिओही केले असल्याने कुणाला पुरावा मागायलाही स्कोप राहिलेला नाही. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

Operation Sindoor LIVE Updates: दहशतवाद्यांच्या कोणत्या तळांवर हल्ला झाला? वाचा सविस्तर...

सरजल कॅम्प, सियालकोट: ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या चार सैनिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते.

महमूना जया कॅम्प, सियालकोट: ते आयबीपासून 12 ते 18 किलोमीटर अंतरावर होते आणि हिजबुल-मुजाहिदीनचा एक मोठा कॅम्प होता. कठुआमध्ये दहशत पसरवण्याचे हे केंद्र होते. पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही येथूनच रचण्यात आला होता.

मरकझ तैयबा मुरीदके: ते आयबीपासून 18 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनीही येथे प्रशिक्षण घेतले.

मरकज सुभानअल्लाह, भावलपूर: ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. हे जैश-ए-मोहम्मदचे केंद्र होते.

पीओजेकेमधील नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर असलेले मुझफ्फराबाद येथील सवाई नाला कॅम्प हे लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते.

सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद, हे जैश-ए-मोहम्मदचे स्टेजिंग एरिया आहे. ते शस्त्रे, स्फोटके आणि सामान्य जगण्याच्या प्रशिक्षणाचे केंद्र देखील होते.

गुलपूर कॅम्प, कोटली: ही एलओसी 30 किलोमीटर दूर होती. राजौरी आणि पूंछमध्ये सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा हा तळ होता.

बरमाला कॅम्प, बिंबर: हे नियंत्रण रेषेपासून 9 किमी अंतरावर आहे. येथे शस्त्र हाताळणी, ओळखपत्र आणि जंगल जगण्याच्या केंद्राचे प्रशिक्षण देण्यात आले.

अब्बास कॅम्प, कोटली: हे नियंत्रण रेषेपासून 13 किमी अंतरावर आहे. लष्कर-ए-तैयबाचे फिदायीन येथे तयार केले जात होते. त्यात 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती.

Operation Sindoor LIVE Updates: लष्कराच्या पत्रकार परिषदेत दाखवल्या दहशतवाद्यांच्या छावण्या, VIDEO

ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या हद्दीत 12-18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सियालकोटमधील महमूना झोया कॅम्पसह दहशतवादी छावण्यांचे व्हिडिओ देखील दाखवले. हे हिजबुल मुजाहिदीनच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहे. जम्मू प्रदेशातील कठुआमध्ये दहशतवाद पसरवण्याचे हे एक नियंत्रण केंद्र आहे. या छावणीने पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्याची योजना आखली आणि त्याचे दिग्दर्शन केले.

Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर उद्या सर्वपक्षीय बैठक

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीला सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. 

Raj Thackeray On Operation Sindoor: एयर स्ट्राईक हे उत्तर असू शकत नाही: राज ठाकरे

पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्यांना धडा शिकवला पाहिजे असे मी म्हटले होते. मात्र दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध नव्हते. युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रील आणि सायरन वाजवायचे. मुळात हे का घडलं? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतके पर्यटक असताना तिथे सुरक्षा का नव्हती हे महत्त्वाचे आहे. 

हे एअर स्ट्राईक वगेरे करने काही उत्तर नाही. आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जातोय ही काही ,योग्य गोष्ट नाही. पाकिस्तानला काय बरबाद करणार? ते आधीच बरबाद झालेत.

ऑपरेशन सिंदूर वगेरे काय नावे देता हे महत्त्वाचे नाही. तुम्ही काय पाऊले उचलता ते महत्त्वाचे आहे...

Operation Sindoor Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर पालघरमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे  देशभरात अतिशय उत्साहात स्वागत होत आहे. पालघरच्या बोईसर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचा जयजयकर करत एकमेकांना पेढे भाराऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Operation Sindoor LIVE Updates: लष्कराची पत्रकार परिषद, ऑपरेशन सिंदूरबाबत मोठे खुलासे

पहलगाममधील या हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच भारतातील इतर भागात संतापाची लाट उसळली. हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधांबाबत काही पावले उचलली, ज्याची घोषणा 23 एप्रिल रोजी करण्यात आली. यानंतर 22 एप्रिलच्या या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि योजना आखणाऱ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक मानले गेले. 

हल्ल्यांना पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील भागात दहशतवादी पायाभूत सुविधांवर कारवाई करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूल्सवरील आमच्या गुप्तचर देखरेखीमुळे भारताविरुद्ध आणखी हल्ले होण्याची शक्यता दिसून आली आहे आणि म्हणूनच, त्यांना रोखणे आणि त्यांचा प्रतिकार करणे अत्यावश्यक मानले गेले.

Operation Sindoor LIVE Updates: लष्कराच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

पहलगाम हल्ला अमानूष होता. कुटुंबातील सदस्यांना लोकांना मारलं गेलं. जिवंत सोडलेल्या लोकांना हल्ला कसा जाला हे जाऊन सांगण्यास सांगितलं होतं. जम्मू काश्मीरमधील पर्यटन संपवण्यासाठी हा कट होता. जम्मू काश्मीरचा विकास रोखण्यासाठीचा हा हल्ला होता. जम्मू काश्मीरमधील शांती भंग करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. 

पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे संबंध समोर आले आहेत. साक्षीदार आणि इतर तपास यंत्रणांच्या आधारे हल्लेखोराची ओळखही पटली आहे. पाकिस्तानचा या हल्ल्याचा कटाचा सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला. 

भारताने या हल्ल्याननंतर पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत कठोर पावले उचलले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्याविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. भारतावर यापुढेही दहशतवादी हल्ले होऊ सकतात. त्यामुळे भारताला कठोर पाऊल उचलणे गरजेचं होते.

Sindoor Operation LIVE Updates: पहलगाम हल्ल्यातील हल्लेखोरांची ओळख पटली

पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे संबंध समोर आले आहेत. साक्षीदार आणि इतर तपास यंत्रणांच्या आधारे हल्लेखोराची ओळखही पटली आहे. पाकिस्तानचा या हल्ल्याचा कटाचा सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला. 

LIVE Updates: भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

भारतीय लष्कराची पत्रकार परिषद लाईव्ह:

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूर अपडेट्स: थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद

 ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारतीय लष्कराची महत्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत ही महत्त्वाची पत्रकार परिषद असेल

Yogesh Kadam On Operation Sindoor: वाघाने फक्त पंजा उगारला... योगेश कदम यांची प्रतिक्रिया

भारताने आजपर्यंत कधीच पाकिस्तान बांगलादेश वर भ्याड हल्ले केले नाहीत हे फक्त प्रत्युत्तर आहे,वाघाने फक्त पंजा उगारलेला आहे अजून जबडा उघडायचा आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी तुळजापूर येथे दिली आहे. आपण POK आता ताब्यात घेतलं पाहिजे पाकिस्तानचा जो दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा प्रयत्न चालू तो कायमस्वरुपी संपवला पाहिजे असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे. लादेन तिकडे सापडतो, दाऊद पण तिकडेच आहे. ज्या पाकिस्तानने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे. त्यामुळें त्यांनी सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी असे बोलूच नये असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Sindoor Operation LIVE Updates: 'ऑपरेशन सिंदूर'.... खेड वासियांकडून जल्लोष

भारताने आज पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून क्षेपणास्त्र हल्ला केला. अनेक अतिरेक्याना कंठस्नान घातलं आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.  खेडवासीयांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. सरकारने पाकिस्तानला अशी अद्दल घडवावी की भारतावर वाकडी नजर करताना पुढचे 10 जन्म पाकिस्तानला विचार करावा लागेल. आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याची भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासह खेडवासीय उपस्थित होते

Amit Shah On Sindoor Operation: 'निष्पापांच्या क्रुर हत्येचा बदला...', गृहमंत्री अमित शहांची मोठी प्रतिक्रिया

भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सशस्त्र दलांचा  अभिमान आहे. ऑपरेशनसिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. 

Sharad Pawar Press Conference On Operation Sindoor: आपण आपल्या सैन्याच्या पाठीमागे उभे राहावे: शरद पवारांचे आवाहन

गेल्या आठवड्यामध्ये काश्मीरमध्ये जे घडलं त्यानंतर साहजिकच लोकांमध्ये अस्वस्थता होती. ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात२७ लोक मरतात. अशावेळी कुठल्याही देशाला बघ्याची भूमिका घेता येत नाही. पण हे करताना काळजी घेणे महत्त्वाचे होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये पीओके आहे. तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केले

असे दिसते त्याचे कारण म्हणजे तिथे दहशतवादी कँप आहेत. तिथे ट्रेनिंग दिले जाते, दारुगोळा तयार  केला जातो.

जो निर्णय घ्यायचा होता तो पाकिस्तान बॉर्डर ओलाडूंन न जाता जे हल्ले झाले ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेतला. यामध्ये एक बदल दिसला की जे काही १० दिवसापूर्वी झालेते त्यानंतर देशात काही जनांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेबाबत संशय होता. मात्र हल्ल्यानंतर संबंध काश्मीरी जनता भारतासोबत राहिली. जम्मू काश्मीर विधानसभेचे अधिवेशन झाले त्यात एकमताने या हल्ल्याचा निषेध झाला. त्यावेळी मुख्यमंत्री ओमर ओब्दुलला यांनी केलेले भाषण तुम्ही ऐकले असेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आक्रमक आहे असे दिसू नये याबाबत भूमिका घेतली ती योग्य होती. आज या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासियांची आणि राजकीय नेतृत्वांची जबाबदारी  आहे की एअरपोर्स आणि लष्कराने जी भूमिका घेतली त्याच्या पाठीमागे उभे राहावे. अशी भूमिका आमचीही आहे.  काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चिनने आपल्याला समर्थन दिलेले नाही.

युद्धाला सुरुवात होईल का हे आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान कुठपर्यंत पुढे जाईल माहिती नाही. त्यांना त्यांची ताकद माहिती आहे, भारताची ताकद माहिती आहे.. आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाकची जी आर्थिक कोंडी करण्याबाबत जी पावले उचलली गेली त्यामध्ये काही चुकीचे नाही.

हा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर कुठलाही देश बघ्याची भूमिका घेऊ शकत नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांनी भूमिका घेतली ती योग्य होती. सिंदूर हे नाव दिले ते योग्य आहे, कारण काही निष्पाप भगिणींचे कुंकु पुसले गेले त्यामुळे जर हे नाव दिले असेल तर ते योग्य आहे. अशा घटनांवर संकुचित भूमिका घेणे शहाणपणाचे नाही. अशावेळी संयम दाखवावा लागतो. वातावरण पाकिस्तानमध्येसुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानी नेतृत्वावर नाराज आहे. आज आपण एकत्र राहूया..

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पंढरपुरात पेढा वाटून आनंदोत्सव

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर या हल्ल्याचा आनंदोत्सव पंढरपुरात पेढे वाटून करण्यात आला. पहलगांमधील अतिरेकी हल्ल्याचा भारतीय सेनेने आज ऑपरेशन सिंदूर मधून बदला घेतला. ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी मॉर्निंग वॉक वेळी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद... भारत माता की जय असा घोषणा देण्यात आला.

Shivsena UBT ON Operation UBT: ऑपरेशन सिंदूरवर शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरवर शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, भारतीय लष्कराचे मानले आभार!

Eknath Shinde On Operation Sindoor: देशवासियांना न्याय मिळाला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय नागरिकांना या हल्ल्याची अपेक्षा होती. ईट का जवाब पत्थर से असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Mallikaarjun Kharge On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरवर मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया

पाकिस्तान आणि पीओकेमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताचे एक अढळ राष्ट्रीय धोरण आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळ रोखणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि धाडसाचे कौतुक करतो.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवसापासून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी सशस्त्र दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राष्ट्रीय एकता आणि एकता ही काळाची गरज आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवला आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे: मल्लिकार्जुन खरगे

DCM Ajit Pawar On Operation Sindoor: देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर', अजित पवारांची प्रतिक्रिया

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर नागपूरमध्ये जल्लोष

भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे राज्यभरात स्वागत केले जात आहे. नागपूरमध्ये नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला तसेच भारत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. 

Rahul Gandhi On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, सैन्याचे अभिनंदन

भारतीय लष्कराकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हवाई हल्ल्यामध्ये 62 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे ट्वीट केले आहे.

Operation Sindoor LIVE Updates:भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीचा देशाला अभिमान: शरद पवार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor LIVE Updates: भारताने उध्वस्त केलेले 9 दहशतवादी हल्ला

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले

मरकज सुभान अल्लाह,

 बहावलपूर - जैश मरकज तैयबा, 

मुरीदके - लष्करसरजल,

 तेहरा कलान - जेईएमएमहमूना झोया,

 सियालकोट - एचएमएममाहमूना झोया, बरनाला - लष्करमर्कज अब्बास, 

कोटली - जैश मरकज राहिल शाहिद, 

कोटली - एचएमएसशवाई मुरकझाबाद, 

लशकराबाद मुरकज, कोटली कॅम्प, 

मुझफ्फराबाद - जेईएम

CM Devendra Fadnavis On Operation Sidoor: ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. जय हिंद भारत माता की जय असे खास ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

Operation Sindoor LIVE Updates: दहशतवाद्यांना अशीच शिक्षा द्यावी: असदुद्दीन औवैसी

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्याचे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मी या हल्ल्याचे स्वागत करतो असे त्यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor LIVE Updates: आम्ही देशाच्या सैनिकांसोबत: ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भारतीय सैन्यदलांसोबत आहोत, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरच्या धमाक्यावर राज्यात जल्लोष, फटाके फोडले

भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअरस्ट्राइक केले ऑपरेशन सिंदूर नावाखाली एअरस्ट्राइक करण्यात आला करण्यात आला ह्या बातम्या समाज माध्यमावर झळकल्यानंतर पहाटेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून आपला आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे

Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरमध्ये पहलगाम हल्ल्याशी संबंधित अड्ड्यावर हल्ला

भारतीय सशस्त्र दलांनी लक्ष्य केलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांबाबत अधिक माहिती समोर आली आहे एनआयच्या माहितीनुसार, भारताकडून  मरकझ सुभान अल्लाह, जैश-ए-मोहम्मद बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान- हे मरकझ जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करते आणि 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यासह दहशतवादी योजनांशी संबंधित आहे. पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगारांना या छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते

Operation Sindoor LIVE Updates: केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची तिन्ही लष्करप्रमुखांशी चर्चा

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी भारताच्या तिन्ही लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी हल्ल्याबाबतची सर्व माहिती आणि सद्यपरिस्थिती जाणून घेतली.

Operation Sindoor LIVE Updates: Pm मोदींचे आभार, पतीच्या मृत्यूचा बदला घेतला: शुभम द्विवेदीच्या पत्नीची भावुक प्रतिक्रिया

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शुभम द्वीवेदी यांच्या पत्नीने भावुक प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पंतप्रधान मोदींवर विश्वास होता, त्यांचे मनापासून आभार. त्यांनी माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला. माझ्या पतीला आज खरी श्रद्धांजली मिळाली, असं ऐशन्या द्विवेदी यांनी म्हटले आहे. 

Operation Sindoor LIVE Updates: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवाद्यांचा खात्मा: सूत्रांची माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आहे. या ऑपरेशन सिंदूरमध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर विमानतळे रद्द

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. धर्मशाळा, लेह, जम्मू, अमृतसर या विमानतळांवरील उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. 

Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हल्ल्ल्याची कबुली

पाकिस्तानने दिली भारताच्या हवाई हल्ल्याची पुष्टी — 5 ठिकाणी कारवाई झाल्याचे मान्य:  पाकिस्तानकडून ज्या ठिकाणांवर भारताने कारवाई केल्याची कबुली:

कोटली

अहमदपूर शरकिया

मुझफ्फराबाद

बाग

मुरीदके

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर बीएसएफ अलर्ट, LOC वर गोळीबार

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर BSF ला अलर्ट करण्यात आलं आहे. LoC (नियंत्रणरेषा) वरील प्रत्येक सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर 72 तास शाळा बंद करण्याचा निर्णय

ऑपरेशन सिंदूरच्या धमाक्यानंतर पठाणकोटमध्ये 72 तास शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे ट्वीट

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराकडून महत्त्वाचे ट्वीट...

Operation Sindoor LIVE Updates: भारताचे ऑपरेशन सिंदूर: डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

भारताने दहशतवादी स्थळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून संघर्ष सुरु आहे. सर्व सुरळित व्हावे, असे ते म्हणालेत..

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त

भारताकडून हल्ला झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मिरमधील स्थिती

Operation Sindoor LIVE Updates: एलओसीवर जोरदार फायरिंग

ऑपरेशन सिंदूरनंतर एलओसीवर जोरदार फायरिंग...

Operation Sindoor LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरबाबत 10 वाजता पत्रकार परिषद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण मंत्रालय (MoD) आणि परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांचं संयुक्त पत्रकार परिषद 10 वाजता पार पडणार आहे. त्यानंतर 11 वाजता  हल्ल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ सुरक्षा समिती (CCS) बैठक होणार असून 11 नंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. 

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत भाजप मंत्र्यांचे महत्वाचे ट्वीट

केंद्रीय मंत्री किरण रिजुजु यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरची माहिती..

Operation Sindoor: भारताच्या हल्ल्याआधी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी पाकिस्तानमध्ये बैठक

पहलगाम हल्ल्यापूर्वी 19 एप्रिलला लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी पाकिस्तान मध्ये बैठक केली होती. त्यानंतर पहलगाम हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांची ती ठिकाणं भारताने उद्धवस्थ केली आहेत

Operation Sindoor: पाकिस्तानला उत्तर देण्याचा अधिकार: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पोकळ धमकी

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतीय हल्ल्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे

शाहबाज शरीफ म्हणाले, "भारताने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी केलेले हे हल्ले भ्याडपणाचे प्रतीक आहेत." त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "पाकिस्तानला या आक्रमणाला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे."

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 दहशतवादी अड्डे उध्वस्त

भारतीय सशस्त्र दलांनी *‘ऑपरेशन सिंदूर’* या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे. ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती. एकूण नऊ  ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com