जाहिरात

Mumbai-Ahmedabad Highway: वाहतूक ठप्प, गाड्यांच्या 50 किमीपर्यंत रांगा, 15 तास वाहतूक कोंडीत लोक अडकले

प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात ही पावसाचा मोठा अडधळा निर्माण होत आहे.

Mumbai-Ahmedabad Highway: वाहतूक ठप्प, गाड्यांच्या 50 किमीपर्यंत रांगा, 15 तास वाहतूक कोंडीत लोक अडकले
पालघर:

मनोज सातवी

गुजरातमध्ये  मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचा फटका  भिलाड परिसराला बसला आहे. बिलाड परिसरातून मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. हा महामार्ग पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे भिलाड ते चारोटी दरम्यान सुमारे 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो ट्रक, कंटेनर, बस आणि खासगी वाहने या वाहतूक कोंडीत अडकली आहे.  पुढे किंवा मागे जाण्याचा कोणता मार्ग शिल्लक राहीला नाही. त्यामुळे त्यांची अवस्था विकट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महामार्गाची हीच स्थिती आहे. 

गेल्या काही दिवसापासून गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात मोठं नुकसान ही झालं आहे. याचा फटका मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला ही बसला आहे. त्यात पालघर जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना ही घडल्या आहे. रस्त्यावरत पाणी आल्याने त्याचा थेट परिणाम हा वाहतूकीवर झाला आहे. सतात पाऊस होत असल्याने हा पाणी कमी होत नाही. तर ते वाढतच जात आहे. जसे पाणी वाढत आहे तसे महामार्गावरील ट्राफीक ही वाढत असल्याचं दिसून येत आहे.

नक्की वाचा - CJP Protest: 2 तास बंद दारआड चर्चा, 3 मागण्या, 1 मागणीमुळे पेच? सरकारसोबत CJP ची चर्चा काय झाली?

भिलाड ते चारोटी या दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे. काही ठिकाणी कमी होत नाही. त्यामुळे वाहनांना पुढे जाण्यास अडचणी येत आहेत. वाहने एकाच जागेवर उभी आहेत. जवळपास 12 ते 15 तासांपासून महामार्गावर ही वाहनं अडकून पडली आहेत. अनेक ठिकाणी अन्न आणि पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं ही समोर आलं आहे. महामार्ग पोलीस आणि प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात ही पावसाचा मोठा अडधळा निर्माण होत आहे. 

नक्की वाचा - Paper Leak Law: पेपर लीक प्रकरणी मोदी सरकारचा मोठा निर्णय, सोमवारी संसदेत बिल येणार, वाचा काय असेल तरतूद?

पालघर जिल्ह्याला तर पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरूवारी तर शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र दुसरीकडची स्थिती मात्र वेगळी होती. अनेक प्रवासी Mumbai-Ahmedabad Highway वर अडकून पडले आहेत. त्यांना ना खाण्याची व्यवस्था आहे ना पिण्याची सोय आहे. यात मोठ्या संख्येने ट्रक्स आहेत. सर्व महामार्ग सध्या जाम असल्याचं दिसत आहे. त्यात वाहतूक पोलीसांची मोठी कसोटी लागली आहे. ते दिवस रात्र हे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com