जाहिरात

Ashadhi Wari: आषाढीत पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष 'जर्मन हँगर', जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे

या मागणीमुळे यंदाच्या पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष जर्मन हँगर उभे केले जाणार आहेत.

Ashadhi Wari: आषाढीत पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष 'जर्मन हँगर', जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे
  • आषाढी वारीत महिला वारकऱ्यांसाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे
  • महिला वारकरी भक्तांसाठी पालखी मार्गावर स्वतंत्र जर्मन हँगरमध्ये वास्तव्याची सुविधा उपलब्ध असेल
  • जर्मन हँगरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमसह दिला जाणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

संकेत कुलकर्णी 

महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. प्रशासकीय पातळीवर आषाढी वारीचे नियोजन आणि आराखडे देखील तयार होत आहेत. अशातच पुणे विभागीय आयुक्त आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यंदाच्या वारीत महिला वारकरी भक्तांसाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वारीत पालखी मार्गावर महिलांना राहण्यासाठी वेगळी आणि विशेष व्यवस्था जर्मन हँगरच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे. 

राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या उपस्थितीत आज आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पंढरपूर देवस्थानच्या विश्वस्त ॲड माधवी निगडे यांनी यंदाच्या वर्षी वारीमध्ये महिला वारकरी भक्तांसाठी विशेष जर्मन हँगर प्रशासनाकडून उभे राहावे. या जर्मन हँगरमध्ये केवळ महिलांच्या वास्तव्याची सुविधा असावी. तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम देखील याच जर्मन हँगरमध्ये उभा करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.

नक्की वाचा - DMart Offers: 'डी-मार्ट' ग्राहकांनी फुल्ल! जून महिन्यात काय आहे खास, ज्यामुळे ग्राहकांची उडालीय झुंबड

विशेष म्हणजे या मागणीला राज्यमंत्री मिसाळ आणि विभागीय आयुक्त तेली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाय तात्काळ निर्णय ही घेतला आहे. आषाढीच्या वारीत देहू ,आळंदी ते पंढरपूर अशा पालखी मार्गावर महिला वारकरी भक्तांची मोठी गर्दी वाढत आहे. जर्मन हँगरमध्ये हजारो भाविक एकाच वेळेस वास्तव्यास असतात. गर्दीमध्ये महिला भाविकांना वास्तव्याची गैरसोय होते. त्यामुळे महिला भाविकांना स्वतंत्रपणे जर्मन हँगरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वास्तव्यास जागा निर्माण करून देण्याचा प्रयत्न माधवी निगडे यांच्या मागणीतून पुढे येत आहे. 

नक्की वाचा - Interesting News: कपड्यांच्या साइजची रंजक गोष्ट! S, M, L साइजची सुरुवात कधी झाली? रेडीमेड कपड्यांचा इतिहास

या मागणीमुळे यंदाच्या पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष जर्मन हँगर उभे केले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून 61 कोटी रुपयांच्या निधीतून वारकरी भक्तांसाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. याच निधीतून जर्मन हँगर देखील उभे केले जातात. यामध्ये आता पालखी मार्गावर महिलांसाठी राखीव जर्मन हँगर आणि स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उपलब्ध होणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com