संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News : पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेसाठी मंदिर २३ आणि २४ जून रोजी बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर यामध्ये बदल करण्यात आला आहे. विठ्ठल मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला स्थगितीमुळे २३ आणि २४ जून रोजी मंदिर नियमित खुलं राहणार आहे.
दोन्ही दिवस मंदिर खुलं राहणार...
विठ्ठलाच्या मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेसाठी 23 आणि 24 जून रोजी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असणार होते. मात्र रासायनिक लेपण प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे उद्या आणि परवा मंदिर नियमितपणे भाविकांसाठी खुलं असणार आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात मंदिर समितीकडून अपील दाखल करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया कशाप्रकारे योग्य आहे, ही बाब न्यायालयापुढे निदर्शनास आणून देणार असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विठ्ठल मूर्तीच्या संवर्धित लेपन प्रक्रियेबाबत उद्या पुन्हा न्यायालयात निर्णय होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world