जाहिरात

Pandharpur Wari: नीरा भिवरा पडता दृष्टी...', विठुनामाच्या गजरात तुकोबारायांचा 'नीरा स्नान' सोहळा

Ashadhi wari Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: संत तुकोबारायांच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आले आहे.. सोमवारी 30 जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता.

Pandharpur Wari: नीरा भिवरा पडता दृष्टी...', विठुनामाच्या गजरात तुकोबारायांचा 'नीरा स्नान' सोहळा

      देवा राखुंडे, प्रतिनिधी:

Sant Tukaram Maharaj palkhi Sohala 2025:  विठ्ठल- रुक्मिणीच्या जयघोषात भक्तीचा अलौकिक संगम असलेला आषाढी वारीचा (Ashadhi Wari 2025) सोहळा सध्या सुरु आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आज तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. त्याआधी नीरानदीकाठी तुकोबारायांच्या पालखीचे शाही स्नान पार पडले. 

Pandharpur Wari: गोल रिंगण, उभं रिंगण म्हणजे काय? वारीमध्ये रिंगण का केलं जाते? जाणून घ्या सर्व माहिती

                    ll नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करीता शुद्ध सृष्टी
                        अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्ठी बोलिला ll

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून निघाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील वारीचा प्रवास हा इंदापूर तालुक्यातील सराटी येथील शेवटच्या मुक्कामाने संपला. आज पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील सराटी गावामध्ये संत तुकोबारायांच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आले.निरा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. 

इंदापूर तालुक्यातील सराटी येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी सराटी येथील नीरा नदीच्या काठावर जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आले आहे.. सोमवारी 30 जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता.

सराटी गावातील  शेवटचा मुक्काम आटोपून आज मंगळवारी 1जुलै रोजी  सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. सुप्रभातच्या या रम्य सोहळयाने वैष्णव आनंदला गेला आहे.  दुष्काळामुळे मागील काही वर्षात तुकोबारायांचे पादुकांना नीरा स्नान हे टँकर मधील पाण्याच्या साह्याने करण्यात येत होते.

Pandharpur Wari: विठुरायाची भेट अपूर्ण राहिली! माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 वारकऱ्यांचा मृत्यू

परंतु यावर्षी पहिल्यांदाच  ऐन उन्हाळ्यात नीरा नदी परिसरातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी वाहते आहे. या वेळी हजारो वैष्णवांनी नदीपात्रात डुंबण्याचा आनंदही साजरा केला. भक्तीमय वातावरणामध्ये पादुकांना नीरा स्नान केल्यानंतर तुकाराम तुकाराम चा गजर करत हा संपूर्ण पालखी सोहळा पुढील अकलूज येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com