'मी निवडून हिरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर बसू. मात्र विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही, असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. 

Advertisement
Read Time: 2 mins

सुनील कांबळे, लातूर

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने चार जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. यातील लातूरमधील सचिन मुंडे यांच्या घरी जाऊन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियाचं सात्वंन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत म्हटलं की, निवडणुकीत निवडून आले असते तर मी हिरो झाले असते. मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर बसू. मात्र विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही, असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. 

(नक्की वाचा- आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर)

निवडणुकीत पडले म्हणजे संपले असं होत नाही. देशात पहिल्या पाचमध्ये मला मते पडली आहे. 3000 मते कमी पडली नाहीतर मी निवडून आले असते. मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. मात्र मी हिरो झालेले कुणाल कसं आवडेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)

पंकजा मुंडे यांनी पुढे म्हटलं की, ताई 2019 पडल्या. तेव्हापासून 5 वर्ष ताई आणि आम्ही वनवास भोगला, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता ताई पुन्हा पडल्या, आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला. तुम्ही कशाला घाबरता राज्यात 12-13 लाख मते आपल्या एका इशाऱ्यावर पडली आहेत. पुढे 25-30 लाख मते पडतील. सगळं सोडून घरी बसायचं असेत तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. आधी 5 वर्ष वाट पाहावी लागली, आता 2 महिने वाट पाहा फक्त, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं.  

Advertisement
Topics mentioned in this article