धाराशिवमधील परंडा विधानसभा मतदारसंघात (Paranda Assembly Constituency) अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी स्वत:च्याच निवडणूक चिन्हाबद्दल केलेल्या मागणीवरुन सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या अपक्ष उमेदवाराचं चिन्ह आहे चप्पल. विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. यावेळी कांबळे यांनी निवडणूक (Assembly Election 2024) प्रशासनाकडे वेगळीच मागणी केली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरावर चप्पल घालायला बंदी करा, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ निवडणूक प्रचार आणि प्रसार करण्यास बंदी असते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी संभाजी कांबळे स्वत:चं निवडणूक चिन्हाबद्दल ही मागणी केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कांबळेंनी सांगितलं की, मतदारांना बाहेरच चप्पल ठेऊन यायला सांगा. ते चप्पल घालून आले तर माझ्या निवडणूक चिन्हाचा प्रचार होऊन आचारसंहितेचा भंग होईल. कांबळे यांनी मतदारांच्या पायाला दुखापत होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत गालिचे अंथरण्याची मागणी देखील केली आहे. याशिवाय मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनी देखील चप्पल बाहेर काढून याव्यात अशी कांबळे यांची मागणी आहे. त्याबाबत रीतसर लेखी मागणीच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. आता निवडणूक अधिकारी यावर काय भूमिका घेतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्की वाचा - "मी पवार साहेबांना सोडलं नाही...", बारामतीतील सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?
उमेदवाराने काय केलीये मागणी?
- मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरात चप्पल घालायला बंदी करा
- मतदान कर्मचारी, अधिकारी यांच्या चप्पल ही बाहेर काढून ठेवा
- चप्पल या निवडणूक चिन्हाचा प्रसार होऊ नये म्हणून आयोगाकडे लेखी मागणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world