देवा राखुंडे, बारामती
राष्ट्रवादीत फूट पाडून महायुतीत सोबत गेलल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवलं जात आहे. अजित पवारांवर देखील शरद पवारांना या वयात धोका दिल्याची टीका होत आहे .मात्र मी शरद पवारांना सोडलं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
तुम्हाला वाटत असेल या वयात अजित पवारांनी साहेबांना सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलेलं नाही. सगळ्याच आमदारांचे मत होतं, यामध्ये सगळ्यांच्या सह्या होत्या, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील ढाकळे येथे प्रचार सभेदरम्यान केलं आहे. बारामती विधानसभेत वातावरण तापलेलं पहायला मिळत असताना अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
(नक्की वाचा- "गुलाबी जॅकेट घातले तरी गद्दारीचा रंग कसा लपवणार", अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा)
अजित पवार म्हणाले की, कोरोनात दीड वर्षे माणसं जगवायला गेली. तो काळ कसोटीचा होता. कोरोनाचं संकट गडद असल्याने माणसांच्या आरोग्याला अधिक महत्व द्यावे लागले. तर अडीच वर्षे विरोधी पक्षनेता असल्याने अडीच वर्षे तिथे वाया गेली. त्यामुळे विकासात्मक कामे करता आली नाहीत.
तुम्हाला वाटत असेल या वयात अजित पवारांनी साहेबांना सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलेलं नाही सगळ्याच आमदारांचं तसं मत होतं. सगळ्यांच्या सह्या होत्या. माझी एकट्याची भूमिका नव्हती, असं अजित पवार म्हणाले.
(नक्की वाचा- "महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका", संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका)
मतदारसंघातील अनेक मंजूर केलेल्या कामांना त्यावेळी सरकारने स्थगिती दिला होती. जनतेची कामे होत नव्हती, मी विरोधी पक्षनेता होतो. पाच वर्षात माझी अडीच वर्षे वाया गेली तरी देखील सत्तेत सहभागी झाल्यावर 9000 कोटी रुपयांचा विकास निधी बारामतीकरांसाठी आणू शकलो. पुढे देखील विकास करायचा आहे. मी अर्थमंत्री असल्यामुळे एवढा निधी बारामतीकरांना देऊ शकलो. माझ्याकडे 7.50 ते 8 लाख कोटी रुपयांचे बजेट असतं, त्यातून बारामतीसाठी विकासात्मक कामे करता येतात, असंही अजित पवारांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world