
दिवाकर माने, परभणी
Parbhani News : परभणी शहरातील प्रसिद्ध पोहे विक्रेते परमेश्वर कदम (60 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे. संजीवनी पोहे सेंटर नावाचे हॉटेल ते चालवत होते. 'कदमचे पोहे' या नावाने त्यांच्या हॉटेलची ओळख होती. परभणी शहरातील वसमत रोडवर ही घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परमेश्वर कदम यांनी संजीवनी पोहे सेंटर हॉटेलमध्ये काल संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परभणीत हळहळ व्यक्त केली जात आहे. परमेश्वर कदम यांना कदम मामा म्हणून देखील ओळखत होते. संजीवनी पोहे सेंटरच्या माध्यमातून त्यांनी हॉटेल व्यावसायिक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
(नक्की वाचा- लग्नासाठी कुणी मुलगी देईना, सुनाही निघून गेल्या... 'या' गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव!)
परमेश्वर कदम यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळालेल्या त्याच्या हॉटेलबाहेर मोठी गर्दी जमली होती. परमेश्वर यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Badlapur News : बदलापुरमध्ये भाजपने भाकरी फिरवली; पक्षाची जबाबदारी ज्येष्ठांकडून तरुणांकडे...
छोट्या दुकानापासून त्यांना आपल्या पोहे विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. यांच्या पोह्याची चव फक्त परभणी जिल्ह्यापुरतीच मर्यादित नव्हती तर नांदेड, हिंगोली आणि जिल्ह्यातील इतर गावं खेड्यातून देखील लोक त्यांचे पोहे खाण्यासाठी येत असत. शांत आणि मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या कदम मामांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world