दिवाकर माने, परभणी:
Parbhani Takalwadi Village News: घर विकायचे आहे, गाडी विकायची आहे किंवा जमीन विकायचे आहे.. अशा जाहिराती तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. पण चक्क गाव विकायचे आहे? असा फलक कधी पाहिला आहे नसेल. सध्या परभणा जिल्ह्यात असाही अजब प्रकार समोर आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेकदा आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या टाकळवाडी ग्रामस्थांनी अखेर संपूर्ण गावच विक्रीला काढल्याचे फलक लावून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. हे फलक राणीसावरगाव बसस्थानक आणि पांगरी फाट्यावर लावल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कारण काय?
४ नोव्हेंबर रोजी गावातच ग्रामस्थांची बैठक घेऊन “रस्ता नसल्यामुळे गाव विक्रीला काढायचा” सर्वानुमते निर्णय घेत ५ नोव्हेंबर रोजी राणीसावरगाव बस स्थानकासह पांगरी फाटा येथे ‘टाकळवाडी गाव विकणे आहे' असे फलक लावले आहेत. पंचायत समिती व प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून व विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ टाकळवाडी ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढल्याच्या घटनेने प्रशासनात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world