दिवाकर माने, प्रतिनिधी
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचे हिंसक पडसाद शहरात उमटले होते. या प्रकरणात 50 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. परभणीमध्ये रात्रीच्या वेळी कोंम्बिग ऑपरेशन करण्यात आलं नाही. रात्री परिस्थिती नियंत्रणात आणतानाच या लोकांना अटक करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण त्यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी अटक करणाऱ्यांमध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. नवा मोंढा या ठिकाणी एक गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणी या लोकांना अटक करण्यात आली आहे. बस, ट्रकवर दडगफेक केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे, असं उमाप यांनी सांगितलं.
संविधानाची विटंबना केल्याबद्दल त्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तीन गुन्हे पहिल्या दिवशी दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवसी रास्ता रोको झाला, गाड्या फोडण्यात आल्या. बाजारपेठांमध्ये दुकानांचे नुकसान करण्यात आले. त्याप्रकरणी 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. विविध कलमांअंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आले. बेकायदा जमाव जमवणं, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दंगल माजवण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : परभणीत नेमकं काय घडलं? आंबेडकर अनुयायी रस्त्यावर का उतरले?)
परभणी शहरात बंदचे आयोजन करण्यात आले होते, तालुक्याच्या ठिकाणीही बंदचे आयोजन करण्यात आले होते. तिथे आंदोलक तहसीलदारांना निवेदन देणार होते. परभणीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. काही मोर्चेकऱ्यांनी हे कृत्य केले आहे. बाजारपेठेत दुकानांचे बोर्ड आणि सीसीटीव्हींचे नुकसान करण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जमाव जमला होता. परवा जमाव जमला होता, तो परत जात असताना ही घटना घडली. बंद शांततेत सुरू होता. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून हा प्रकार घडला. परिस्थिती हाताळण्यासाठी काहीसा विलंब निश्चित झाला आहे. घटना झाल्यानंतर पोलिसांनाही अनेक ठिकाणी रिस्पॉन्स द्यावा लागला, मात्र ही परिस्थिती अल्पावधीत आटोक्यात आणली आहे, असं उमाप यांनी सांगितलं.
या सर्व हिंसाचारात पोलीस उपाधीक्षकासह, 9 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. तपास संपल्यानंतर यामध्ये काही कट होता का याची माहिती देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world