जाहिरात
29 minutes ago

Maharashtra Live Blog: पवित्र श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार असून राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविक शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे मंदिरे भाविक- भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसत आहे. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज ऑपरेशन सिंदूरवरुन चर्चा होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये चांगलेच घमासान पाहायला मिळणार आहे. 

Live Updates: साताऱ्यातील प्रचलित असलेले वाईमधिल गणपती मंदिर पाण्यात

साताऱ्यातील प्रचलित असलेले वाईमधिल गणपती मंदिर पाण्यात 

धोम धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गणपती मंदिर पाण्यात 

पावसाचा जोर वाढला तर आणखी धोम धरणातून पाणी सोडणार  

छोटा पुलही ण्याखाली जाण्याची शक्यता

Live Updates: संजय राऊतांवर नांदगावला अदखल पात्र गुन्हा दाखल

Anchor :- शिवसेना नेते व  खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नांदगाव भाजप मंडळ अध्यक्ष संजय सानप यांनी तक्रार दाखल केली असून,खा.राऊत यांनी वृत्तवाहिन्यांवरील दिलेल्या मुलाखतीत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.मंत्री महाजन यांच्यावर व भाजप पक्षावर वैयक्तिक स्वरूपाचे विधान केल्याचा तक्रारीत म्हटले आहे.

Live Updaes:येवल्याच्या महामृत्युंजय मंदिरात शिवभक्तांची गर्दी..

नाशिकच्या येवल्यातील अमरधाममध्ये असलेल्या महामृत्युंजय मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली.सकाळी महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धअभिषेक करत महाआरती संपन्न झाली. यावेळी पहाटेपासूनच शिवभक्तांच्या भोले बाबांच्या दर्शनासाठी रांगा होत्या.मंदिर गाभाऱ्याला, तसेच महादेवाच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आलेल्या शिवभक्तांना साबुदाणा वड्याचा  प्रसाद वाटप करण्यात आला..

Live Updates: श्रावणी पहिल्या सोमवारी शहापूराती पुरातण वाफे‌ शिवमंदिरात भाविकांची गर्दी

शहापूर वाफा येथील पुरातन श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. हे शिवकालीन पुरातन शिव मंदिर आहे. सहाशे ते साडेसहाशे वर्ष पुरातन व जागृत शिव मंदिर असल्याने या ठिकाणी आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांची व शिवभक्तांची भोलेनाथाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत आहे . मोठ्या भक्तीने-भाव व उत्साहाने हर हर महादेवाचा जय घोष भाविक करत असल्याने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला आहे. पाहटे पासूनच या ठिकाणी शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळाली.

Live Update:ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नेते राजभवनात राज्यपालांची भेट घेणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नेते राजभवनात राज्यपालांची भेट घेणार 

 विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे अनिल परब सुनील प्रभू सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुनील शिंदे अजय चौधरी  हे ठाकरेचे शिवसेनेचे आमदार नेते  राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार 

 मंत्र्यांची बेताल वक्तव्य, मंत्र्यांवर होणारे आरोप आणि त्यासंबंधीचे पुरावे राज्यपालांसमोर सादर करणार असल्याची माहिती..

 या मंत्र्यांवर व काही आमदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करणार आहेत

Shravan Somvar: श्रावण सोमवार असल्याने औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, काल मध्यरात्रीपासूनच भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले असून तर प्रभु नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत.. रात्री दोन वाजता हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे..

Live Updates: श्रावण सोमवारामुळे घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

आज पहिलाच श्रावण सोमवार असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक भाविक रात्रीच वेरूळमध्ये दाखल झाले होते, तर पहाटेपासून दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत व या पाचमधील तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. वेरूळचे श्री घृष्णेश्वर हे शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग होय. याचा उल्लेख शिवपुराण, रामायण, महाभारत, स्कंदपुराण आदी पुरातन ग्रंथामध्ये आढळतो. त्यामुळे श्रावण महिन्यात राज्यसह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात येत असतात.

Live Updates: मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आज सकाळी मुंबईत पोहचेल

मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आज सकाळी मुंबईत पोहचेल, आझाद मैदान पाहणी करणार 

29 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा धडकणार आहे, त्यापूर्वी आझाद मैदाण पाहणी केली जात आहे 

मनोज जरांगे यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईत पाहणीसाठी दाखल झाले आहेत

अंतरवालीचे सरपंच देखील आहे

Live Updates: भिवंडी तालुक्यातील तलवली येथे भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

 भिवंडी पारोळ रस्त्यावर असलेल्या तळवली  फाटा या ठिकाणी वेगवान टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे संकेत पंढरीनाथ पाटील वय 28 वर्षे असं युवकाचा नाव असून पारोळ हून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या युवकाच्या गाडीला समोरून येणाऱ्या टेम्पो ने धडक दिल्याने युवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Live Update: नंदुरबार जिल्ह्यात पावसाची दांडी

नंदुरबार जिल्ह्यात शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र वरून राजा दोन आठवड्यापासून बरसला नाही आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासूनच चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती मात्र पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेती पिकांना त्याच्या फटका बसण्याची शक्यता आहे पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे परंतु दोन आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे शेती पिकांना याच्या फटका बसत असून पिक लागले आहेत आणखीन काही दिवस पाऊस नाही आला तर कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे 

Live Updates: नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदत वाढीची मागणी

कांद्याचे दर वाढल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत यंदा तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असून नाफेड, एनसीसीएफ मार्फत दोन जुलैपासून कांदा खरेदी सुरू झाली आहे. 28 जुलै पर्यंत कांदा खरेदी पूर्ण करण्याची मुदत सहकारी संस्थांना देण्यात आली आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शिल्लक आहे.नाफेड एनसीसीएफने कांदा खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी.त्याचप्रमाणे नाफेड एनसीसीएफने जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल 1465 रुपयांचा दराने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने  किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com