
सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. नक्की काय आहे हे प्रकरण? वाचा संपूर्ण रिपोर्ट..
Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वेगवेगळ्या भागात खड्डे पडल्यानंतर नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि खड्डे बुजविताना कामाचा दर्जा न ठेवणाऱ्या 26 अभियंत्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे. कामात कसूर ठेवल्याचं म्हणत त्यांना याबाबत 3 दिवसांत खुलासा ही द्यायला लावला आहे , खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) सुरू केलेल्या पॉटहोल मॅनेजमेंट या अँप वर या खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या , शहरातील पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1 हजार 875 खड्डे पडले होते. त्यापैकी 1 हजार 464 खड्डे बुजवले असून शहरात केवळ 411 खड्डे बुजवले गेले नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र पालिकेच्या या पॉटहोल मॅनेजमेंट अँप वर नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं त्याच बरोबर कामात कसूर ठेवणाऱ्या 26 अभियंत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा- Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल)
शहरातील रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची केली जातायत, खड्डे पडल्यावर पुन्हा ठेकेदाराकडून ते बुजवले जातायत, दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उकळून केवळ कागदावरच खड्डे बुजवले जातायत, त्यामुळं शहरातील नागरिकांचे जीवन रामभरोसे असल्याचं नागरिक म्हणू लागलेत. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांन कडे दुर्लक्ष करून सर्व सामान्य नागरिकांच्या जिवताशी खेळणाऱ्या केवळ अभियंत्यांना केवळ नोटिसा न देता निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई प्रशासन करणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world