जाहिरात

Pune News: पोलिसाचा बर्थडे, भाईंची एन्ट्री! जंगी सेलिब्रेशन भोवलं; 3 जणांचे निलंबन

पिंपरी चिंचवडमध्ये चक्क गुंडांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठी कारवाई केली आहे. 

Pune News: पोलिसाचा बर्थडे, भाईंची एन्ट्री! जंगी सेलिब्रेशन भोवलं; 3 जणांचे निलंबन

पिंपरी चिंचवड: एकीकडे राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, जालन्यातील अमानुष मारहाण प्रकरण तसेच स्वारगेट अत्याचाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये चक्क गुंडांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठी कारवाई केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस प्रवीण पाटील यांचा बर्थ डे पोलिस स्टेशनच्या समोर अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. रात्री बारा वाजल्यानंतर भररस्त्यात प्रविण पाटील यांचा केक कापला धक्कादायक म्हणजे या बर्थडेला चार गुन्हेगारही उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली असून तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.  यामध्ये प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डांगरे यांचा समावेश आहे. तर महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर पोलिस कर्मचारी प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे सांगवी पोलिस ठाण्यासमोर चित्रीकरण केलेला व्हिडिओ प्रसारीत झाल्यामुळे, खुद्द पिंपरी चिंचवड पोलिसांच्याच या बर्थ डे सेलिब्रेशन मुळे पिंपरी चिंचवडकर चिंता व्यक्त करू लागलेत. सर्वसामान्य नागरिकांना रात्री 10 नंतर फटाके फोडण्याची बंदी आहे, कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध सेलिब्रेशन करण्यात आले.

ट्रेंडिंग बातमी - Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले

या सेलिब्रेशन मध्ये गुन्हेगार सहभागी होते, विनापरवाना ड्रोन ही उडविन्यात आला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ ही प्रसारित करण्यात आला ,जेव्हा हे सेलिब्रेशन होत होते तेव्हा ही पोलीस ठाण्यात उपस्थित होते, मात्र या सेलिब्रेशनमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि पोलिसांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित होत होता त्यामुळ पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर