जाहिरात

PCMC News: पिंपरी चिंचवडमध्ये 5 नवीन पोलीस ठाणे! गुन्हेगारांचे धाबे दणाणणार, वाचा नावे अन् सर्व डिटेल्स

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलिस ठाण्याचा समावेश होणार आहे.

PCMC News: पिंपरी चिंचवडमध्ये 5 नवीन पोलीस ठाणे! गुन्हेगारांचे धाबे दणाणणार, वाचा नावे अन् सर्व डिटेल्स

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad News:  पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती गुन्हेगारी रोखण्याचे, नागरिकांना भयमुक्त करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असतानाच वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलिस ठाण्याचा समावेश होणार आहे.

Pune News: माऊलींच्या पालखी सोहळ्यात धक्कादायक प्रकार! गोंधळ, भिती, भाविकांची धावपळ, 65 जण जखमी

पिंपरी चिंचवडमध्ये 5 नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलिस ठाण्याचा समावेश होणार आहे, पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी, आणि देहूरोड या पाच पोलिस ठाण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे पुढील काळात पोलिस ठाण्याची संख्या ही 23 वरून 28 वर जाणार आहे.

या नवीन पोलीस ठाण्यांमुळे काही नव्याने देखील पदे निर्माण होणार आहेत, यात परिमंडळ 4 साठी 11 पदे, पिरंगुट पोलिस ठाणे 190, जांबे पोलिस ठाणे 189, पिंपळे सौदागर पोलिस ठाणे 183, मोशी पोलिस ठाणे 194 , देहुगाव पोलीस ठाणे 194 अशी एकूण 961 पदे नव्याने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी निर्मित केली जाणार आहेत.

Bhandara News: पंधरा दिवसात 2 बळी, मुलांच्या शाळा बंद, घराबाहेर पडणे मुश्किल.. भंडाऱ्यात काय घडतंय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com