सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: राज्य सरकारच्या लेक लाडकी योजनेचा फायदा मिळवून देतो असं सांगत एका महिलेची 52 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर...
नक्की वाचा - अपहरणापूर्वी देशमुखांनी चालकाला केलं होतं अलर्ट, शेवटचं वाक्य काय होतं? NDTV मराठीच्या हाती महत्त्वाचा जबाब
सरकारकडून मुलगी झाल्यानंतर 75 हजार रुपयांची लाडकी लेक योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते, यासाठी तुमची निवड झाली असल्याचा फोन पिंपरी चिंचवड शहरातील एका महिलेला आला, त्यानंतर ही मदत मिळवण्यासाठी काही शुल्क भरावे लागणार असल्याचे या महिलेला सांगण्यात आले. या महिलेच्या मुलीचे नाव, जन्मतारीख ,आरोग्य विभागात नोंदविलेला मोबाईल क्रमांक ही अचूक या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने सांगितला यावर त्या महिलेनं विश्वास ठेवत येणाऱ्या लिंक वर टप्पा टप्प्याने 52 हजार रुपये भरले नंतर आपली फसवणूक झाली असल्याचं या महिलेच्या लक्षात आले.
Beed Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ; गावात तणावपूर्ण परिस्थिती
लाडकी लेक योजना ही राज्य शासनाची असून मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणून गरीब व अल्प उत्पन्न गटातील मुलींसाठी शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत टप्प्याटप्पेने आर्थिक लाभ दिला जातो मुलीच्या जन्मापासून शालेय शिक्षणाच्या टप्प्यावरती तिचं वय 18 वर्ष होईपर्यंत हे 75 हजार रुपये दिले जातात. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याच्या प्रकारच्या फसवणुकांसाठी नवजात बालकांच्या माहितीचा माग उभा घेतात ही माहिती खाजगी रुग्णालय नोंदणी एजन्सी किंवा अदयावत झालेल्या सार्वजनिक आरोग्य डेटाबेस मधून मिळवली जाते.
काही प्रकरणांमध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत देखील ही माहिती दिली जाते का या माहितीची सुरक्षा कितपत केली जाते या प्रकरणी सरकार काय करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मात्र या घटनेनंतर नवजात बाळाची माहिती, त्यांच्या पाल्याचे संपर्क क्रमांक यांची माहिती या सायबर भामट्यांपर्यंत पोचली कशी याबाबत काही सुरक्षा बाळगण्यात आली नव्हती का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.