जाहिरात

अपहरणापूर्वी देशमुखांनी चालकाला केलं होतं अलर्ट, शेवटचं वाक्य काय होतं? NDTV मराठीच्या हाती महत्त्वाचा जबाब 

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना, अत्यंत महत्त्वाचा जबाब NDTV मराठीच्या हाती लागला आहे.

अपहरणापूर्वी देशमुखांनी चालकाला केलं होतं अलर्ट, शेवटचं वाक्य काय होतं? NDTV मराठीच्या हाती महत्त्वाचा जबाब 

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना, अत्यंत महत्त्वाचा जबाब NDTV मराठीच्या हाती लागला आहे. देशमुखांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याचवेळी आपली हत्या होणार असल्याची देशमुखांना चाहूल लागली होती. देशमुख यांच्या अपहरणावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत टाकण्यात आलं. दरम्यान त्यांना स्कार्पिओमध्ये टाकताना संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले की, बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जिवे मारणार आहेत. असे म्हणल्यानंतर आरोपींनी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन ती गाडी केजच्या दिशेने नेली. त्यामुळे अपहरण करण्यासाठी आलेले लोक आपल्याला जीवे मारणार असल्याचं संतोष देशमुख यांच्या लक्षात आलं होतं.

Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा काय? उज्वल निकमांनी एक एक गोष्टी सांगितल्या

नक्की वाचा - Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा काय? उज्वल निकमांनी एक एक गोष्टी सांगितल्या


अपहरणावेळी नेमकं काय घडलं?

डोणगांव टोलनाक्यावर काळया रंगाची स्कार्पिओने संतोष देशमुखांची गाडी अडवली

मागून-पुढून दोन गाड्यांनी देशमुखांच्या गाडीची वाट अडवून धरली

दोन्ही गाड्यांमधून सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे उतरले

सुधीर सांगळे याने एक मोठा दगड घेवून देशमुखांच्या गाडीच्या काचेवर मारला

आरोपींच्या हातामध्ये प्लास्टिकचा पाईप, गॅसचा पाईप, क्लच वायर गुंडाळलेला लाकडी दांडा, लाकडी काठी व इतर शस्त्रे होते

आरोपींनी संतोष देशमुख यांना गाडीतून खाली ओढली आणि मारहाण केली.

मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकले. 

बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जिवे मारणार आहेत, असे संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले.

काही वेळात संतोष देशमुख यांना गाडीत घेऊन आरोपी केजच्या दिशेने गेले. 

यावेळी स्वीफ्ट गाडीदेखील काळ्या स्कार्पिओच्या मागे गेली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: