जाहिरात

PM Narendra Modi : 'जनतेच्या हजारो कोटींची बचत झाली;, नागपुरात पीएम मोदींनी सांगितले आयुष्मान भारत योजनेचे फायदे

देशात सरकारकडून गरीबांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी काय पाऊले उचलली जात आहेत, याबाबत पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.

PM Narendra Modi : 'जनतेच्या हजारो कोटींची बचत झाली;, नागपुरात पीएम मोदींनी सांगितले आयुष्मान भारत योजनेचे फायदे

Prime Minister Narendra Modi visits Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्यानिमित्ताने नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी भेट दिली. याशिवाय दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशास अभिवादन केलं आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. पायाभरणीच्या कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. 

देशात सरकारकडून गरीबांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी काय पाऊले उचलली जात आहेत, याबाबत आपली भूमिका मांडली. मोदींनी देशभरातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान योजना सुरू केल्याचं सांगितलं. या योजनेचा भारतीयांना मोठा फायदा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीएम मोदींनी सांगितले आयुष्मान भारत योजनेचे फायदे...
आयुष्मान भारत योजनेच्या फायद्यांची माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या वृद्धांना उपचाराची काळजी करण्याची गरज नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे आज कोट्यवधी जनतेला मोफत उपचार सुविधा मिळत आहेत. हजारो जन औषधी केंद्रामुळे देशात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वस्त औषधं मिळत आहेत. देशात हजारो डायलेसिस सेंटर मोफत सेवा देत आहेत. यामुळे देशभरातील जनतेचे हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, माधव नेत्रालय एक असं संस्थान आहे, जे अनेक वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात प्रकाश येतो. यानिमित्ताने नव्या सेंटरची पायाभरणी होत आहे. यामुळे आणखी लोकांच्या आयुष्यातील अंध:कार दूर होईल. त्यानिमित्ताने माधव नेत्रालयाशी जोडलेल्यांना शुभेच्छा.

Gudi padwa 2025: विकासाची महागुढी उभारू या, राष्ट्रधर्म वाढवू या!,मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नक्की वाचा - Gudi padwa 2025: विकासाची महागुढी उभारू या, राष्ट्रधर्म वाढवू या!,मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मोदी म्हणाले, आज स्वास्थ क्षेत्रात देश ज्या पद्धतीने काम करतोय.  माधव नेत्रालय त्या प्रयत्नांना वाढवत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची प्राथमिकता आहे. आयुष्मान भारतामुळे कोट्यवधींना मोफत सुविधा मिळत आहेत. हजारो जन सुविधा केंद्र मध्यमवर्गीय आणि गरजूंना स्वस्त औषधं देत आहेत. गेल्या दहा वर्षात गावांमध्ये लाखो आरोग्य आयुष्मान मंदिर तयार झाले आहेत. येत्या काळात लोकांच्या सेवेसाठी अधिकाधिक चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: