विकासकामे थांबवण्यात काँग्रेसची डबल पीएचडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, मेट्रो अशी अनेक विकासकामे थांबवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. महाविकास आघाडीत भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत. महाराष्ट्र लुटीचं लायसन्स पुन्ही त्यांना तुम्ही देणार का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करत 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चंद्रपूरमधील चिमूर येथे प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. काँग्रेसचं सरकार आलं तर ते तुमचं आरक्षण हिसकावतील, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर विकासकामे थांबवण्यात काँग्रेसची डबल पीएचडी असल्याचा टोलाही मोदींना लगावला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणाविरोधात बोलतात. आपल्याला काँग्रेसच्या या षडयंत्राचं शिकार व्हायचं नाही. त्यामुळे आपण 'एक राहू तर सेफ राहू'. जर तुमची एकता तुटली तर काँग्रेस सर्वात आधी तुमचं आरक्षण हिसकावून घेईल. काँग्रेसच्या शाही परिवाराची मानसिकता राहिली आहे की ते देशावर राज्य करण्यासाठी जन्मले आहेत. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर  काँग्रेसने दलित, आदिवासींना पुढे येऊ दिलं नाही. आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या साथिदारांपासून सावध राहिलं पाहिजे, असंही मोदींनी म्हटलं. 

Advertisement

महायुती आहे तर प्रगती आहे

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात भाजप-महायुती आहे तर प्रगती आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्र भाजपाचं मी अभिनंदन करतो की, त्यांनी उत्तम संकल्पपत्र जारी केलं आहे. लाडक्या बहिणींसाठी, शेतकरी मित्रांसाठी, युवकांसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकाहून एक शानदार संकल्प मांडले आहेत. एआय विद्यापीठ, वॉटर ग्रीड प्रोजेक्ट, घराघरात पाईपने पाणी, पक्के घरे यात महाराष्ट्राचं भविष्य उज्जल बनवण्यासाठीच्या अनेक अनेक योजनांचा उल्लेख आहे  पुढील पाच वर्षांसाठी हा संकल्पपत्र विकासाची गॅरंटी बनेल, असं मोदींनी म्हटलं.  

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात)

केंद्रात एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात महायुती सरकार, असं हे डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे विकासाचा वेगही दुप्पट आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी मागील अडीच वर्षात विकासाचा वेग पाहिला आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक परराष्ट्र गुंतवणूक होत आहे. येथे नवीन विमानतळे, महामार्ग, महाराष्ट्रात डझनभर वंदेभारत ट्रेन धावत आहेत. अनेक रेल्वे मार्गांचा विस्तार होत आहे. महायुती सरकार वेगाने काम करत आहे. तर महाविकास आघाडीने विकासकामे कशी रोखली, हे लोकांनी पाहिलं आहे. चंद्रपुरातील नागरिक अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करत आहेत. आमच्या सरकारने कांपा-वरोरा रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. नागपूर-गडचिरोली रेल्वे मार्गाचं कामही पूर्णत्वाला आलं आहे, असंही मोदींनी म्हटलं. 

Advertisement

विकासकामे थांबवण्यात काँग्रेसची डबल पीएचडी

महाराष्ट्राचा विकास महाविकास आघाडीला शक्य नाही. विकासकामे थांबवणे यात काँग्रेसची डबल पीएचडी आहे. समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, मेट्रो अशी अनेक विकासकामे थांबवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. महाविकास आघाडीत भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत. महाराष्ट्र लुटीचं लायसन्स पुन्ही त्यांना तुम्ही देणार का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जम्मू काश्मीर अनेक दशकांपासून फुटीरतावादी आणि दहशतवादात धुमसत राहिला. महाराष्ट्रातले अनेक जवान मातृभूमीचे संरक्षण करता करता जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले. कलम 370 च्या आडून हे सगळं सुरु आहे. कलम 370 ही काँग्रेसची देण होती. कलम 370 रद्द करुन आम्ही काश्मीर आणि भारताचं नातं जोडलं. मात्र संविधानाची माळ जपणाऱ्यांनी सात दशकाहून अधिक काळ जम्मू काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान लागू करु दिलं नाही. 

(नक्की वाचा-  अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)

पाकिस्तानला हवं ते काम काँग्रेस करतंय

देश स्वतंत्र झाल्यानंतर मोदी येईपर्यंत देशात दोन संविधान चालत होते. देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालत होता. तर जम्मू काश्मीरमध्ये वेगळं संविधान होतं. मात्र आम्ही आलो आणि कलम 370 ला जमिनीत गाडलं. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव जम्मू काश्मीर विधानसभेत मांडला आहे. पाकिस्तानला जे हवं आहे ते काम काँग्रेस करत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.    
  

Topics mentioned in this article