
Prime Minister Narendra Modi : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पाडव्याला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंती दिनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात जाऊन डॉ. हेडगेवार यांना भाववंदना करणार आहेत. रेशीमबागेत स्मृती मंदिराव्यतिरिक्त ते माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेत स्मृती मंदिर ट्रस्ट चे प्रमुख या नात्याने पूर्व सर कार्यवाह भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार. गेल्या पंतप्रधान झाल्यानंतर अकरा वर्षांत प्रथमच रेशिमबाग येथे संघ भूमीवर जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एकाच मंचावर दिसणार आहेत. एका वर्षानंतर दोघे एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी ते एकत्र दिसले होते. कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आचार्य गोविंद गिरी महाराज, अवधेशानंद महाराज आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा उपस्थिती असेल.
नक्की वाचा - Sharad Pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; पत्र लिहून केली 'ही' मागणी
हिंगणा रोडवर 5.83 एकर जागेवर माधव नेत्रालय हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची पाच लाख चौरस फूट जागेची भव्य इमारत होणार आहे. 517 कोटी रुपयांच्या प्रकल्पात 250 बेड्सचे हॉस्पिटल, धर्मादाय वॉर्ड आणि नाममात्र शुल्क वॉर्ड देखील असणार आहेत. सामाजिक संस्था आणि देणगीदारांच्या सहकार्याने प्रकल्प उभा राहणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world