जाहिरात

Sharad Pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; पत्र लिहून केली 'ही' मागणी

शरद पवारांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

Sharad Pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; पत्र लिहून केली 'ही' मागणी

Sharad Pawar appreciated Prime Minister Narendra Modi : यंदाच्या वर्षी तब्बल सात दशकांनंतर 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. विशेष म्हणजे याच संमेलनाला शरद पवार संमेलनाध्यक्ष होतं. दोघांनी एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि संमेलनावेळी त्यांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आभारही मानले. 

काय म्हणाले शरद पवार? 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आल्याने यंदाच्या संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. संमेलनातील तुमचं अभ्यासपूर्ण आणि सखोल भाषण जगभरातील मराठी जणांना भावलंय. भारताच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान आणि जतन करण्यात तुमचं नेतृत्व नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना एकत्र पाहायला मिळालं. यावेळी शेजारी बसलेल्या नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्चीवर नीट बसता यावं यासाठी मदत केली. याशिवाय शरद पवारांच्या ग्लासात स्वत: पाणी ओतलं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या स्नेहासाठी शरद पवारांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले. 

Inside Story : मायावतींवर टीका, कांशीराम यांचं कौतुक, काय आहे राहुल गांधींचा प्लॅन?

नक्की वाचा - Inside Story : मायावतींवर टीका, कांशीराम यांचं कौतुक, काय आहे राहुल गांधींचा प्लॅन?

शरद पवारांची मागणी काय आहे?
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावे अशी अनेकांची भावना आहे. तरी नवी दिल्ली महानगरपालिकेच्या (NDMC) अखत्यारीत येत असलेल्या तालकटोरा स्टेडियमवर ही शिल्पं स्थापित करण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला निर्देश देण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी सहयोग करावा, अशी विनंती केली.