जाहिरात

Education News: OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता शिक्षणाचा खर्च सरकार करणार, 'ही' आहे योजना

या योजनेंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च सरकार देणार आहे.

Education News: OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता शिक्षणाचा खर्च सरकार करणार, 'ही' आहे योजना
रत्नागिरी:

टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, इबीसी आणि डी एन टी स्टुडंट या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी मधील ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी “प्रधानमंत्री यशस्वी अंतर्गत टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, इबीसी आणि डी एन टी स्टुडंट” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक खर्च शासनामार्फत मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाइन सुरू आहे. तरी या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मुख्याध्यापक यांच्यामार्फत नॅश्नल  स्कॉलरशीप पोर्टलवर भरण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

जिल्ह्यातील टॉप क्लास विद्यालयांच्या याद्या या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. यादीतील सन 2022-23,2023-24 आणि 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यालयांनी बोर्ड परीक्षेमध्ये सतत 100% विद्यार्थी उत्तीर्ण असा निकाल प्राप्त केलेला आहे, अशा विद्यालयातील विद्याथ्यांसाठी Top Class Education in School For OBC,EBC& DNT Student" Under PM YASHSVI-reg. या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर"सुरु आहे. ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासकीय मदतीतून भागविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थी वार्षिक कुटुंबीय उत्पन्न कमाल 2 लाख 50 हजार. मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादीनुसार निवड करण्यात येणार आहे.यात किमान 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. सलग वर्षांमध्ये 100 टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड यात करण्यात येईल. या योजनेंतर्गत इयत्ता 9 वी व 10 वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रु. 75 हजार  (शुल्क, वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश आदीसाठी). इयत्ता 11 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रु. 2 लाख 25 हजार  (वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, कॉम्प्युटर व कोचिंग फी इत्यादींसाठी). आर्थिक मदत करण्यात येते.

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल

पुढील प्रमाणे अर्ज प्रक्रीया असेल. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे, शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल,  राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी,  मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार, शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केले जाईल. त्यात काही  अटी व निरीक्षण  आहेत. आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक, नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक, इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रत्नागिरी यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी 415639 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com