बीडमध्ये बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Beed Accident : सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर ननवरे हे दोघे रविवारी सकाळी परीक्षा बंदोबस्ताला दुचाकीवरून निघाले होते.

Advertisement
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

बंदोबस्ताला दुचाकीवरून निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. भरधाव कारने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघतात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. बीडच्या नेकनूर परिसरात हा अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर ननवरे हे दोघे रविवारी सकाळी परीक्षा बंदोबस्ताला दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान नेकनूर परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीला भरधाव स्विफ्ट  कारने समोरून धडक जोरदार धडक दिली.

नक्की वाचा-  वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक

या अपघतामध्ये रमेश नागरगोजे आणि मच्छिंद्र ननवरे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यामध्ये मच्छिंद्र ननवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)

दरम्यान मृत ननवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. धडक देणारा स्विफ्ट कार चालक पसार झाला असून त्याचा शोध नेकनुर पोलीस घेत आहेत. यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article