जाहिरात

Prahar Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा प्रहार! राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन

बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरु आहे. 

Prahar Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा प्रहार! राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन

Prahar Sanghatana Chakka Jam Andolan: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगाच्या प्रश्नावरुन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.. अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती. आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरु आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्का जाम!

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील क्रांती चौकात हा चक्का जाम केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आज सकाळी वाजेपासून आंदोलन संपेपर्यंत सेव्हन हिल्स ते सेशन कोर्ट सिग्नल आणि गोपाल टी ते सिलेखाना चौक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या मोर्च्यात माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे देखील सहभागी होणार आहे.

Solapur NCP Politics: अजित पवारांचं टेन्शन वाढलं; सोलापुरात पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

जालन्यातही आंदोलन..

जालन्यात आज ते देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी येथे तर अंबड तालुक्यातील दुनगाव फाटा धुळे -सॊलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकर्यांनी रास्ता करत चक्का जाम आंदोलन केलंय. महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.. मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने लोटले. पावसाळी अधिवेशनही पार पडलं.. मात्र सरकारने दिलेलेलं आश्वासन पाळलं नाही.. त्यामुळं प्रहार संघटनेसह शेतकर्यांनी जामवाडी येथे आणि धुळे -सॊलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

 शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासह  शेतमजूर, दिव्यांग मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज पुसद नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनामुळं अकोला - नांदेड तसेच अमरावती आणि पुसद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या आंदोलनात दिव्यांगासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.  जर आमच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष दिलीप भेंडेकर यांनी दिला.

Kadam vs Parab: 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,' रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

अकोल्यात चक्का जाम..

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्याकरिता अकोल्यात आज जिल्हाभरात  प्रहार पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाला जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. अकोला जिल्ह्यातील देवरी फाटा येथे प्रहार पक्षाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलेय..या आंदोलनामुळे सुमारे 2 तास अकोट - शेगाव , अकोट - अकोला रस्ता बाधित झाला होता, यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा सुद्धा दिल्या..शेतकऱ्यांनी यावेळी सात बारा कोरा, दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ या प्रमुख मागण्यासाठी हा रस्ता रोको केला होता

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com