जाहिरात

प्रवाशांसाठी खुशखबर! 'ही' एकच APP डाऊनलोड करा, एसटीचं परफेक्ट लोकेशन कळणार, दसऱ्याला मंत्र्यांची मोठी घोषणा!

Pratap Sarnaik On Aapli ST App : प्रत्येक बस थांब्यावर असलेल्या प्रवाशांना एसटीचं अचूक लोकेशन कळावं, यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय.

प्रवाशांसाठी खुशखबर! 'ही' एकच APP डाऊनलोड करा, एसटीचं परफेक्ट लोकेशन कळणार, दसऱ्याला मंत्र्यांची मोठी घोषणा!
Pratap Sarnaik On ST Bus
मुंबई:

Pratap Sarnaik On Aapli ST App : प्रत्येक बस थांब्यावर असलेल्या प्रवाशांना एसटीचं अचूक लोकेशन कळावं, यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय. 'आपली एसटी'या अॅपचे दुसऱ्याच्या दिवशी लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे. 12 हजारांपेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील 1 लाखांपेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित करण्यात आलं आहे.भविष्यात लाखो प्रवासी या अॅपचा वापर करणार आहेत. पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास,प्रवाशांनी त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहनही मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. 

'आपली एसटी एक मराठमोळं नाव'

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं असून आता या ॲपला ‘आपली एसटी'(Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.  ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ,सोयीस्कर आणि पारदर्शक होईल,यासाठी अधिक भर दिला जाणार आहे.

‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.' या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या 'आपली एसटी'(Aapli ST) ॲपमुळे प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बस स्थानकाची माहिती मिळणार आहे. प्रवासी माहिती केंद्राद्वारे (Passenger Information System) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची रिअल टाईम माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर जास्त वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. प्रवासी बस उपलब्धतेनुसार थेट थांब्यावर पोहोचतील. 

नक्की वाचा >> 'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ

ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे,दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे,आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे)घेणे, यांचा समावेश आहे.याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून,एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.

सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल 12000 हून अधिक बसेसचा लाईव्ह डेटा उपलब्ध आहे.भविष्यात सर्व बसेसचं लोकेशन या अॅपद्वारे शोधता येईल. प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत.तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या तिकीट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केला जाणार आहे,ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण  करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.

नक्की वाचा >> Ulhasnagar Crime 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून,आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.तसेच  महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवून अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात,अशी सूचना त्यांनी केली आहे.सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल, अशी माहिती परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com