जाहिरात
29 minutes ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. आज ते तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार आहेत. याशिवाय महायुतीच्या आमदारांची भेटही घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बीडमधील खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला मकोका लावल्याचे पत्र सादर करून त्याला ताब्यात घेण्याची परवानगी एसआयटीने मागितली असून कोर्टाच्या परवानगीने सीआयडीच्या ताब्यातून एसआयटीने कराडला ताब्यात घेतलं आहे. तर आज पुन्हा त्याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहे. 

Live Update : वाल्मिक कराडला घेऊन पोलीस अधिकारी बीड कोर्टात दाखल

वाल्मिक कराडला घेऊन पोलीस अधिकारी बीड कोर्टात दाखल

Sangli News: सांगलीच्या चिकुर्डे वारणा नदीत मळीमिश्रीत पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे  येथील वारणा नदीत साखर कारखान्याने मळी मळी मिश्रित पाणी नदी पात्रात सोडल्याने नदीचे पाणी मळी मिश्रित झाले आहे. तर नदी पात्रात पाण्याला हिरवा रंग आला आहे. त्यामुळे नदीतील मासे मगरी यांचा मृत्यू झाला आहे. मासे नदी पात्रात मृत अवस्थेत तरंगत आहेत.  वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.. तर लोकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. वारणा नदीचे हे पाणी  काठावरील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी पाणी वापरले जाते. या पाण्याचे दुर्गंधीयुक्त असा वास येत आहे. त्यामुळे पाणी पिण्या योग्य राहिले नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. 

Mumbai News: पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांसोबत संवाद

पीएम मोदी यांच्या उपस्थितीत महायुती आमदार संवाद सुरू:  सीएम देवेंद्र फडणवीस, डीसीएम एकनाथ शिंदे - अजित पवार यांचे काही मिनिटं भाषण त्यानंतर पी एम मोदी भाषणाद्वारे भूमिका मांडणार आहेत. राज्यात महायुती मोठं यशात  पीएम यांनी मोठा सहभाग, एकजूटाने महाराष्ट्र विकास यासाठी राज्यातील सर्व महायुती आमदार आवर्जुन काम करतील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. 

Live Updates: समृद्धीवर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न, ऐतिहासिक वारली चित्रकला व लोकसंस्कृती झळकली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे.  शेवटच्या ७६ कि.मी टप्प्याचे काम पूर्ण,  राज्यातील अभियांत्रिकी आविष्कार असणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या समावेश

समृद्धी महामार्गाच्या ७०१ कि.मी लांबीपैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत दीड कोटीहून अधिक वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, इगतपुरी ते आमने या ७६ कि.मी टप्प्यातील अभियांत्रिकी काम पूर्ण झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान समर्थपणे पेलले आहे. या टप्प्यांमध्ये एकूण पाच बोगदे असून एकूण लांबी ११ कि.मी आहे. त्यात इगतपुरी येथील ७.७८ कि.मी लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता अंदाजे आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. पुढील काही महिन्यात या बोगद्यामधून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. 

निसर्गरम्य परिसराला ऐतिहासिक वारली लोकसंस्कृतीची आणि स्थानिक लोकजीवनाची जोड

समृद्धी महामार्गावरून ठाणे जिल्ह्यातील आमने इंटरचेंजहून नेत्रसुखद प्रवासाची अनुभूती देण्यासाठी महामंडळाने बोगद्यांवर स्थानिक लोककलेची मुद्रा उमटवली आहे. डोंगर-दऱ्या व निसर्गाने नटलेल्या ठाणे व नाशिक जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यांवरील ही  कलाकुसर अधिकच भर टाकत आहे. साधारणपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी बोगद्यांवर चित्र रेखाटण्यासाठी लागला आहे. समृद्धी महामार्गावरील इतर टप्प्यातील विविध उपाययोजनांप्रमाणेच, या अत्यंत सुंदर कलाकृतीमुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना मग्न करणाऱ्या प्रवासाचा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे.

'ऐतिहासिक अशा स्थानिक वारली लोककलेचा जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकला प्राधान्याने कसारा येथील बोगद्यावर रेखाटली आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी बोगद्यावर विपश्यनेचे महत्त्व, पर्यटन तसेच इतर बोगद्याजवळील भिंतीवर स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय आदी चित्रे रेखाटली आहेत. ऐतिहासिक वारली लोकसंस्कृती तसेच स्थानिक लोकजीवन रेखाटून संस्कृती संवर्धनाचा एक वेगळा प्रयत्न महामंडळाने केला असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये मध्यरात्री दोन दुकानात चोरी

मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही घटना घडली आहे. चोरांनी आधी अनिल ट्रेडर्सचं शटर तोडून आत प्रवेश केला, मात्र त्यांना काही सापडलं नाही. मात्र दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर त्याच्या साथीदारासह कैद झाला. यानंतर चोरांनी महेक पेंट्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला लक्ष्य केलं. तिथून सुमारे १४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी दुकानमालक वाशू टेकवानी यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Maharashtra Politics: पालकमंत्रिपदावरुन सस्पेन्स, भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच

राज्यात महायुतीचे सरकार येऊन दीड महिना उलटला असून नवीन मंत्रिमंडळ स्थापनेलाही एक महिन्याचा कालावधी उलटला आहे मात्र असं असताना देखील पालकमंत्री पदाचा सस्पेन्स हा अद्याप काय असून जळगाव जिल्ह्यात दोन भाजपचे व एक शिवसेनेचा असे तीन कॅबिनेट मंत्री असून पालकमंत्री पदावरून भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच कायम आहे.. 

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश आलं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला राज्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल आहे. मात्र महायुतीचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा सुटत नाही तोच महायुतीतील घटक पक्षांकडे मंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला त्यामुळे मंत्रिमंडळाच्या स्थापनेला बराच वेळ गेला. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर खातेवाटप ही लांबले होते. मात्र उशिरा का होईना खाते वाटप ही झाले. पण खातेवाटप होऊनही पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अद्याप काही सुटलेला नाही. त्यातच जळगाव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Live Updates: टोरेस प्रकरणातील सीए अभिषेक गुप्ता सुरक्षा देण्यात येणार

सीए अभिषेक गुप्ता यांनी सुरुवातीपासूनच इथे फ्रॉड सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. इतकेच नव्हे तर सध्या ते आर्थिक गुन्हे विभागाला माहिती देण्यासाठी मदत देखील करत आहेत 

त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना संरक्षण द्यावे अशी याचिका न्यायालयात त्यांनी दखल केली होती . त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांचे वकील प्रियांशु मिश्रा आणि विवेक तिवारी यांनी उच्च न्यायालयात केली होती.

 न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

 यावेळी  पोलिसांनी  30  तारखेपासून 14 तारखेपर्यंत सर्व सीसीटिव्ही जप्त करा असे आदेश देण्यात आले.  आर्थिक गुन्हे विभाग  इतके दिवस झोपला होता का असा सवाल देखील न्यायमूर्ती रेवती डेरे  यांनी केला आहे.

Live Update : समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात दरोडा!

सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात दरोडा.

दरोडेखोरांनी लांबविले हनुमानाचे दागिने .

पुजाऱ्याला बांधून दरोडेखोरांनी हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली.

जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोरांचा पोबारा.

सोनाळा पोलिस घटनास्थळी दाखल.

Live Update : नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला शक्ती दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर नौदलाला अधिक

सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन युद्धनौकांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन युद्धनौकांचे उद्घाटन करण्यात आले. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंहही यावेळी उपस्थित होते. 

Walmik Karad News: वाल्मीक कराडला थोड्याच वेळात केजच्या न्यायालयासमोर हजर करणार

सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर मकोका लावल्याच्या नंतर केजच्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. बीड वरून वाल्मीक कराड याला घेऊन एसआयटी पथक केजच्या न्यायालयात हजर करण्यासाठी रवाना झाला आहे..दरम्यान केज न्यायालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे.. थोड्याच वेळात वाल्मीक कराड याला हजर केलं जाईल.. सुरक्षेच्या दृष्टीने हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबई विमानतळावर आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होणार आहे. तसेच ते महायुतीच्या आमदारांशीही संवाद साधणार आहेत. 

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला भरण्यास मंजुरी

अरविंद केनरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी 

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ

दिल्ली निवडणुकीपूर्वीच कारवाई होण्याची शक्यता

अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपनिश्चिती होण्यापूर्वी पूर्वपरवानगी आवश्यक होती 

केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडी ला पूर्व परवानगी दिली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ED ला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असेल. त्यानुसार ही परवानगी दिली गेलेली आहे

Buldhana News: नायलॉन मांजा विद्युत ताराही तोडू शकतो

सुमारे 3 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन उचलू शकणारा नायलॉन मांजा विद्युत तारांसाठी देखील धोकादायक ठरू शकतो हे समोर आल्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंता देखील हादरून गेले आहेत.

तीक्ष्ण सुरी किंवा तरवारीसारखे परिणाम साधणारा नायलॉन मांजा  विजेच्या तारा तोडू शकतो, हे भयानक सत्य समोर आल्याने वीज पुरवठा संबंधी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे असे म्हणता येईल. दुचाकीस्वारांचे गळे चिरून किंवा चेहऱ्यावर दुखापत करून बदनाम झालेल्या नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा विद्युत पुरवठा खंडित करू शकतो हे भीषण वास्तव बुलढाण्यातील नांदुरा येथे समोर आले आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग बाजीला उधाण आले असताना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात अनेक विद्युत तारांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले आहेत.  नांदुरा शहरात पतंगच्या मांजामुळे कित्येक ठिकाणी विजेचे तार तुटले, त्यामुळे नांदुरा शहरातील या भागातील वीज पुरवठा बंद पडला..आणि त्यापैकी काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अभियंत्यांना यश मिळाले मात्र उर्वरित ठिकाणी नागरिकांना रात्रं अंधारातच काढावी लागली अशी माहिती आहे.

Mumbai Nashik Highway Accident: मुंबई- नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघर जवळ भीषण अपघात झालायं. मालवाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकास धडकून पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. या अपघाता तीन जण जागीच मृत्यू झाले असून जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

Live Updates: पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

वाहतूकदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. शाह यांनी ३ लाख 80 हजारांची लाच मागितली होती. तेंदूपत्ता वाहतूक करणाऱ्या एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी आहे. ते तेंदूपत्ता वाहतूक करतात. ऑगस्ट महिन्यात या वाहतूकदाराने गडचिरोली येथील एका तेंदूपत्ता व्यापाऱ्याचा माल बल्लारपूर येथील बामणी येथे आणला होता. हा व्यवहार 9 लाख रुपयांमध्ये ठरला होता. मात्र, व्यापारी मालाची किंमत व वाहतूक देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे वाहतूकदाराने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बल्लारपूरचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी फिर्यादीकडे व्यावसायिकाकडे अडकलेली रक्कम वसूल करण्याच्या बदल्यात  3लाख  80 हजार रुपयांची लाच मागितली होती. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.

Live Updates: मकरसंक्रांती निमित्त वैनगंगा नदीची स्वच्छता

नेहमी सामाजिक ,सांस्कृतिक, क्रीडा ,आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग तर्फे मकरसंक्रांती निमित्य वैनगंगा नदीवर स्वच्छता ठेवण्यासाठी   जागोजागी कचरापेटी लावून वैनगंगा नदीची स्वच्छता केली गेली तर नदीपात्रात पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिला भाविकांना उघड्यावर कपडे बदलावे लागत असल्याची  बाब लक्षात घेऊन महीला भगिनिंसाठी कपडे बदलविण्यासाठी तंबू भरले गेले  युवारंग परिवार तर्फे दरवर्षी अविरत व निस्वार्थ पने  हे कार्य केले जाते आहे वैनगंगा नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी दरवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात आले........

Bhandara News: भंडाऱ्याच्या पवनी नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी बेटाळा ग्रामविकासीयांचा विरोध

 भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी  बेटाळा ग्रामविकासीयांचा विरोध दिसून येत आहे. तर त्यासाठी बेटाळा ग्रामवासीयांची ग्रामसभा देखील पार पडली. ग्रामसभेमध्ये नागरिकांना बेटाळा गाव जर नगर परिषदेत समाविष्ट झाले तर काय बदल होतील याबाबत माहिती दिली असता. ग्रामवासियांनी या बाबीचा विरोध केला. पवनी नगरपरिषद हद्दीत पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. त्यातच बेटाळा हे गाव नगर परिषदेत समाविष्ट झाल्यास गाव विकासापासून दूर होईल आणि म्हणून बेटाला हे गाव नगर परिषदेत समाविष्ट होऊ नये यासाठी सर्वांनुमते ठराव या ग्रामसभेत पारित करण्यात आला. यावरून बेटाळा ग्रामवासी हे पवनी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा विरोध करत असून पवनी नगर परिषदेत समाविष्ट होणार नसल्याचे दिसून येत आहे. 

Maharashtra Weather Updates: पश्चिम- उत्तर महाराष्ट्रसह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात,उत्तर महाराष्ट्रसह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

पुणे वेधशाळेचा अंदाज 

राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी देखिल गायब 

 ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता 

राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणायची शक्यता

Malegaon News: मालेगावात चोरीच्या 20 बाईकसह तिघांना अटक

 मालेगावच्या कॅम्प पोलिसांनी मोठी चोरीच्या 20 मोटारसायकल जप्त करीत तिघा मोटार अटक केली. मसूद अहमद मोहम्मद शफिक  व जुबेर अख्तर अब्दुल कुदूस अशी अटक  करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरांची  नावे असून मास्टर कीचा वापर करून मोटारसायकली चोरल्याची त्यांनी कबुली दिली.चोरी केलेल्या मोटारसायकली नदीम अहमद अब्दुल हमीद ऊर्फ पप्पू याला ते विकत होते. विशेष म्हणजे त्यांनी चोरी केलेल्या मोटार सायकलचे आर.सी. बुक बनावट तयार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 चोरीच्या मोटार सायकल, मास्टर की,6 बनावट आर. सी. बुक असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Nashik News: येवल्यात नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई...

 नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजामुळे आतापर्यंत 12 पेक्षा  जास्त नागरिक गंभीर जखमी होवून त्यांच्या जीवावर बेतण्याच्या घडल्यनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाने नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत नायलॉन  मांजाचा करणाऱ्या पाच पतंग शौकिनांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आसरी व नायलॉन मांजा जप्त केला. या कारवाईचे  नागरिकांनी स्वागत केले असून, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर व वापरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Walmik Karad News: आज कराड समर्थक घेणार परळीत बैठक; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार

माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड याच्या आईने परळी पोलीस ठाण्यात समोर तब्बल 12 तासापेक्षा जास्त वेळ ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत देखील दिवसभर आंदोलन सुरुच होते याला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचे दिसून आले.अखेर रात्री 9  वा अप्पर पोलीस अधीक्षक चेतना याच्या मध्यस्थीने हे  आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 

आज सकाळी 10 वा पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे.त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. सकाळी 10 ची बैठक झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात देखील निर्णय घेतला जाणार आहे. आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Live Update : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात श्वसनाच्या विकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात श्वसन विकाराच्या रुग्णसंखेत वाढ झाली असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 60% रुग्ण हे श्वसन विकाराचे असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि दिली आहे दरम्यान हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाली असून दूषित हवेपासून होणारे श्वसनाचे विकार टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Live Update : वाल्मिक कराड याला आज केज न्यायालयात हजर करणार

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याचबरोबर कराड याच्यावर मोका देखील लावण्यात आलेला आहे. आज एसआयटीकडून कराड याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसआयटी कराड याची पोलीस कोठडी देखील न्यायालयात मागणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com