जाहिरात

Ashwini Kedari Death: PSI परिक्षेत टॉपर, पण आयुष्याची झुंज हरली; पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत

त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्र-मैत्रिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ashwini Kedari Death: PSI परिक्षेत टॉपर, पण आयुष्याची झुंज हरली; पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत

PSI Exam Topper Ashwini Kedari Death: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या 11 दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या, परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने संपूर्ण खेड तालुक्यासह पुणे शहरावर शोककळा पसरली आहे.

अश्विनी बाबुराव केदारी या मूळच्या खेड तालुक्यातील होत्या. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी २०२३ च्या PSI परीक्षेत राज्यात मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्यांचे यश हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले होते. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्र-मैत्रिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Success Story: मजुराचा मुलगा बनला आर्मी ऑफिसर, IIM ची ऑफर नाकारली, त्याच्या संघर्षाची कथा

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत हा दु:खद प्रसंग घडला. सकाळी अभ्यास करत असताना त्यांनी अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवले होते. ते पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता त्यांना हीटरचा जोरदार इलेक्ट्रिक शॉक बसला. या शॉकमुळे उकळते पाणी त्यांच्या अंगावर सांडले आणि या भीषण अपघातात त्या तब्बल ८० टक्के भाजल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. गेल्या ११ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला

अश्विनी केदारी यांचे निधन हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही तर प्रशासकीय क्षेत्रासाठीही मोठा धक्का बसला आहे. एक हुशार आणि कर्तबगार अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते, जे आता अपूर्ण राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या शिक्षकांमध्येही शोक व्यक्त होत आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आता आढळले...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com