जाहिरात

20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी, कामावर बोलावल्यास कंपन्यांवर कारवाई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एका टप्प्यात मतदान होणार आहे.

20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी, कामावर बोलावल्यास कंपन्यांवर कारवाई
मुंबई:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एका टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं अनिवार्य आहे. यासाठी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरीही कंपन्यांनी जबरदस्तीने बोलावल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुटी देणे व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि अन्य सर्व आस्थापनांसाठी बंधनकारक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी निर्देश जारी केले आहेत. 

बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

मुंबईतील तीन मोठ्या उमेदवारांच्या पायाला दुखापत; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती बदलली

नक्की वाचा - मुंबईतील तीन मोठ्या उमेदवारांच्या पायाला दुखापत; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती बदलली

माननीय भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशांनुसार,  बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यामधील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

भूषण गगराणी यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे - 

•    निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी द्यावी. 

•    सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू राहील. 

•    या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. 

Live Update : आज कोणाची कुठे सभा? शरद पवार अन् उद्धव ठाकरे दोघेही विदर्भात!

नक्की वाचा - Live Update : आज कोणाची कुठे सभा? शरद पवार अन् उद्धव ठाकरे दोघेही विदर्भात!

•    लोक प्रतिनिधित्व अधिनियम-1951 च्या कलम 135 (ख) नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही. 

•    तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधि कारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 

•    सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com