जाहिरात
Story ProgressBack

धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी  

पुण्यातील वानवडी येथे झालेल्या अपघातात महिलेसह काही मुले जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता.

Read Time: 2 mins
धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी  

प्रतीक्षा पारखी, पुणे

पुण्यामध्ये कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणानंतरही अनेक गंभीर दुर्घटना घडत आहेत. पण स्थानिकांकडून सररास नियम धाब्यावर बसवून कायदा हाती घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. अवघ्या 14 वर्षीय मुलाच्या ताब्यामध्ये अवजड टँकर दिल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

(नक्की वाचा: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश)

नेमके काय घडले?

सकाळच्या सुमारास वानवडी येथे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही मुलांसह बाइकस्वार महिलेला एका भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना घडली. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत महिलेसह काही मुले जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर केवळ 14 वर्षीय मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

(नक्की वाचा: संतापजनक! नमाज पठणादरम्यान ओळ चुकल्याने पतीने पत्नीसोबत केले भयंकर कृत्य)

बाइकवरून महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी प्रवास करत होते. त्यांच्या तालमीतच शिकणारी मुले रस्त्याच्या शेजारी धावण्याचा व्यायाम करत होते. यादरम्यान भरधाव टँकरची बाइकला धडक बसताच त्यांची पत्नी वाहनावरून उडल्या आणि रस्त्यावर पडल्या. तर टँकरखाली दोन मुली सापडल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना कसेबसे बाहेर काढले. दरम्यान या दुर्घटनेबाबत स्थानिकांकडून तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटना

- मार्केटयार्ड परिसरात एका ट्रकने एका महिलेला चिरडले होते. 
- कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. 
- उंड्री परिसरात ट्रक-दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला. 

एका पाठोपाठ एक असे गंभीर स्वरुपातील अपघात घडत असताना देखील अल्पवयीन मुले नियम धाब्यावर बसवून वाहने चालवताना दिसत आहेत. 

(नक्की वाचा: पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड)

Pune Tanker Accident | पुण्यात चाललंय काय? 14 वर्षांच्या मुलाने टँकर चालवताना महिलेला उडवलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत 8 ते 10 जणांचा मृत्यू
धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी  
monsoon session of maharashtra state assembly live updates
Next Article
LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विजय वडेट्टीवार हक्कभंग आणणार
;