
सुरज कसबे, पुणे:
Aayush Komkar Murder Case: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्ध होण्याची शक्यता निर्माण झालीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची तब्बल 9 गोळ्या झाडून घेतला. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात टोळीयुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.
नेमकं काय घडलं?
पुण्यात गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांची (Pune Ganpati Festival 2025) तयारी सुरू होती, तितक्यात नाना पेठ परिसरात डीजे वर टपका रे टपका और टपका गाण वाजता इकडं दुचाकी वर आलेले दोघे जण पार्किंगमध्ये उभा असलेल्या वनराज आंदेकर याचा भाचा आयुष कोमकर याला 9 गोळ्या घालतात. यात त्याचा जागीच मृत्यू होतो. यानंतर दुचाकीवर आलेले दोन्ही हल्लेखोर आयुषला गोळ्या मारताना इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर असे ओरडतात. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडते. ती म्हणजे पुण्यात एकदा टोळीयुद्ध.
लेक, सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याचा भयंकर निर्णय! आजोबांनी पत्नीचा गळा कापला अन्...
पुणे शहरात गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तो बंडू आंदेकर याचा मुलगा होता आणि त्याच्या हत्येचा बदला म्हणून वनराजचा मारेकरी आरोपी गणेश कोमकर याच्या 18 वर्षाचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करून पूर्ण केल्याची चर्चा पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात रंगू लागली.
पुणे पोलिसांनी आयुषची आई यांच्या फिर्यादीवरून आंदेकर कुटुंबीयांतील सदस्यांवरती गुन्हा दाखल करत अन्य दोघांवरही गुन्हा दाखल केला , या प्रकरणात आत्तापर्यंत 13 जणांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोणा कोणावर गुन्हे दाखल ?
1 सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर
2 कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर
3 शिवम उर्फ शुभम आंदेकर
4 तुषार वांडेकर
5 स्वराज वांडेकर
6 अभिषेक आंदेकर
7 शिवराज आंदेकर
8 अमन युसुफ पठाण उर्फ खान
9 यश पाटील
10 अमित पाटोळे
11 सुजल राहुल मेरगु
12 आंदेकर कुटुंबातील महिला
13 वाडेकर कुटुंबातील महिला
या प्रकरणी पुणे पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना ताब्यातही घेतले आहे, आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर हे आहेत. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा वनराज आंदेकर याची हत्या मयत आयुषचे वडील गणेश कोमकर याने केली होती. याचा बदला म्हणून ही हत्या झाली असल्याचं बोलल जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे बंडू आंदेकर हे मयत कोमकरचे आजोबा आहेत. असं असताना सुद्धा आजोबांनी मुलाच्या हत्येचा बदला लेकीच्या मुलाची हत्या करून पूर्ण केल्यानं पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मयत आयुषच्या अंत्यविधीसाठी वडील गणेश कोमकर हे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर येणार आहेत, आज आयुषवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अद्याप ही आंदेकर टोळतील काही सदस्य हे बाहेर आहेत. त्यामुळं पुणे पोलिसांसमोर या अंत्यविधीवेळी कोणतेही गुन्हेगारी कृत्य होऊ न देण्याचं मोठ आव्हान असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world